मुंबई : किवी कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. किवी खाल्ल्याने पाचन शक्तीत वाढ होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. चला तर मग जाणून घेऊयात केवी खाण्याचे फायदे…(Eating kiwi is beneficial for health)
-रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी किवी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी तुम्ही एक किवी खाल्ली तर आरोग्यासाठी चांगले असते.
-किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. त्वचेची कांती सुधारते.
-किवीच्या फळामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामधील अॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांमधील घातक बॅक्टेरियांचा नाश करतात.
-आपल्या शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम किवी करत असते.
-किवी खाल्ल्याने संधिवाताची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.
-किवी आमवात, दमा या रोगांवर गुणकारी आहे. यांना याचा त्रास आहे अशांनी तर किवी खाणे फायदेशीर आहे.
-लघवीच्या जागेवर खाज किंवा जळजळ होत असल्याच किवी खाल्ल्यामुळे फायदा होतो.
-मधुमेह रूग्णांसाठी किवी अत्यंत फायदेशीर आहे.
संबंधित बातम्या :
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Eating kiwi is beneficial for health)