रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर रामबाण उपाय ‘लिंबू’!

| Updated on: Apr 06, 2021 | 12:08 PM

लिंबू जवळपास सर्वच लोक आपल्या आहारात घेतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते.

रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर रामबाण उपाय ‘लिंबू’!
लिंबू
Follow us on

मुंबई : लिंबू जवळपास सर्वच लोक आपल्या आहारात घेतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. लिंबूच्या सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते. त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषांपासून मुक्तता मिळू शकते. (Eating lemon is beneficial for health)

लिंबापासून लोणचे, मिश्र लोणचे, सरबत, स्क्रॅश, सुगंधी तेल, लाझ्म कॉर्डिअल, पेक्टीन, सायट्रिक अॅसिड, लायमोनिन तेल, रसायनापासून अर्कपशुखाद्य, तसेच लिंबूसत्व इ. पदार्थ तयार करता येतात. लिंबाचा रस, लिंबाचे तेल, सायट्रिक अॅसिड यांचा निरनिराळ्या औषधी बनविण्यात उपयोग करतात. लिंबाप्रमाणेच, लिंबाच्या सालीचाही उपयोग करता येतो.

-लिंबू पाणी पिणे अनेक लोकांना आवडते तर काही लोकांची सुरूवातच लिंबू पाणी पिण्याने होते. लिंबू पाणी हे असेच एक पेय आहे, जे उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते.

-रस काढल्यानंतर लिंबाची साल फेकून देवू नये. ती चेहऱ्यावर दोन्ही हातांनी नाजूकपणे घासावी. असे केल्याने रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि सौंदर्य खुलते.

-लिंबाच्या सालीचा किस हा ‘लेमन झेस्ट’ म्हणून ओळखला जातो. सॅलेड किंवा अनेक पदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही ‘लेमन झेस्ट’चा वापर करू शकता.

-आरोग्य व सौंदर्य रक्षणासाठी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याने चेहरा धुवावा. कांती तेजस्वी होते आणि सुरकुत्या नाहीशा होतात. त्वचेचा रुक्षपणा निघून जातो.

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या)

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…

(Eating lemon is beneficial for health)