Weight Loss : वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये पोहे खा, होतील अनेक फायदे !

| Updated on: Apr 21, 2021 | 10:05 AM

मॉर्निंग ब्रेकफास्ट तुम्हाला दिवसभराची ऊर्जा देते. अर्थात आपल्या सर्वांना सकाळच्या नाश्ता पोटभरून आणि निरोगी हवा असतो.

Weight Loss :  वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये पोहे खा, होतील अनेक फायदे !
पोहे
Follow us on

मुंबई : मॉर्निंग ब्रेकफास्ट तुम्हाला दिवसभराची ऊर्जा देते. अर्थात आपल्या सर्वांना सकाळच्या नाश्ता पोटभरून आणि निरोगी हवा असतो. अशा वेळी तुम्ही पोहे देखील खाऊ शकता. पोहे पोट भरण्याबरोबर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. सकाळच्या नाश्तामध्ये आपण सर्व वेगवेगळ्या गोष्टी खातो. त्याचबरोबर काही लोक फक्त पोहे खातात. पोहे करण्यासाठी सोप्पे आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. (Eating poha for breakfast is beneficial for health)

100 ग्रॅम पोह्यामध्ये असलेले पौष्टिक घटक

1. कॅलरी: 110

2. चरबी: 2.87 ग्रॅम / 23%

3. कार्ब: 18.8 ग्रॅम / 68%

4. प्रथिने: 2.34 ग्रॅम / 8%

5. कोलेस्टेरॉल: 0 मिलीग्राम

6. सोडियम: 201 मिलीग्राम

7. फायबर: 0.9 ग्रॅम

8. साखर: 0.5 ग्रॅम

9. कॅल्शियम: 15 मिलीग्राम

10. लोह: 1.06 मिलीग्राम

11. पोटॅशियम: 117 मिलीग्राम

12. व्हिटॅमिन ए: 6 एमसीजी

13. व्हिटॅमिन सी: 6.4 मिलीग्राम

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
पोह्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यात फायबर आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे पोहे खाल्ल्याने वजन वाढत नाही. वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात याचा समावेश देखील करू शकता.

लोहाची कमतरता दूर करते
पोहा खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता दूर होते. हे आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवते. शरीराच्या पेशींना ऑक्सिजन प्रदान करते. गर्भवती महिला आणि लहान मुले नियमितपणे पोहे आहारात घेऊ शकतात.

पोटाची समस्या
पोह्यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण कमी आहे, जे पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. हे पचविणे खूप सोपे आहे. या कारणास्तव न्यूट्रिशनिस्ट देखील पोहे खाण्याची शिफारस करतात.

मधुमेहासाठी फायदेशीर
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी पोहे खाणे फायदेशीर आहे. हे खाल्ल्यास भूक कमी लागते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण हळूहळू व्यवस्थित होते.

ऊर्जा वाढते
पोहेमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. पोहेमध्ये सोयाबीन, ड्राई फ्रूट्स आणि अंडी खाल्ल्यास जीवनसत्व व प्रथिने मिळतात. हे शरीर उत्साही करते. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

अशक्तपणासाठी फायदेशीर
पोह्यामध्ये भरपूर लोह असते. जर तुम्ही पोहे दररोज खात असाल तर तुमचा शरीरातील अशक्तपणा कमी होऊ शकतो. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पोहे खूप फायदेशीर आहेत. पोह्याचे सेवन केल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहते. पोहे एक उत्तम नाश्ता आहे.

संबंधित बातम्या : 

Teeth Staining Food | पांढऱ्याशुभ्र दातांना खराब करणाऱ्या ‘या’ 6 गोष्टी वेळीच टाळा!

Weight lose Tips | या गोष्टी आहारात घ्या…वजन कमी करण्यास होईल मदत!

(Eating poha for breakfast is beneficial for health)