आहारात मुळ्याचा समावेश करा आणि मोठमोठ्या आजारांना दूर ठेवा…

| Updated on: Apr 05, 2021 | 9:23 AM

आपल्यापैकी बरेच लोक मुळा खाणे शक्यतो टाळतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, मुळा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

आहारात मुळ्याचा समावेश करा आणि मोठमोठ्या आजारांना दूर ठेवा...
मुळा
Follow us on

मुंबई : आपल्यापैकी बरेच लोक मुळा खाणे शक्यतो टाळतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, मुळा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण मुळ्यात कर्बोदके, फॉस्फरस लोह आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. विशेष म्हणजे कच्चा मुळा खाल्ल्याने चांगली भूक लागून अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते. (Eating radish is beneficial for health)

-मूळव्याध असणाऱ्या रुग्णांना मुळ्याची पाने अथवा त्यांचा रस दिल्याने फायदा होतो. मुळाप्रमाणे त्याची पाने देखील गुणकारी आहेत. मुळ्याची पाने पचण्यास हलकी, रुची निर्माण करणारी आणि गरम आहेत. ती कच्ची खाल्ल्यास पित्त वाढते, मात्र तीच भाजी तुपात घोळवल्यास भाजीतल्या पौष्टिक गुणधर्मात वाढ होते.

-मुळ्यामध्ये एंथोकायनिन असते. त्यामुळे कॅन्सरचा प्रतिकार करण्यास मदत होते आणि यामुळेच आपल्या दररोजच्या आहारात मुळात असणे आवश्यक आहे. मुळ्याची आपण भाजी किंवा चटणी देखील करून खाऊ शकतो. तसेच मुळ्याची कोशिंबीर देखील खाण्यास चवदार लागते.

-मुळ्यामध्ये असलेल्या फॉस्फोरस आणि आर्यनमुळे आपल्या शरीरातील हीमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. ज्या लोकांनाच्या शरीरात हीमोग्लोबिन कमी आहे. त्यांनी मुळा आहारात घेतला पाहिजे. अशक्तपणा कमी करण्यासाठी देखील मुळ्याची भरपूर मदत होते.

-मुळ्यामध्ये अँटी कंजेस्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. जे कफ दूर करण्यात मदत करतात. कफ झाल्यावर मुळ्याचा रस पिल्ल्याने खूप फायदा होतो. यामुळे कफ पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडतो.

-मुळ्याच्या पानांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. हे खाल्ल्याने डायझेशन अधिक चांगल्या पद्धतीने होते. मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्यासही अनेक फायदा होतात.

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Eating radish is beneficial for health)