मुंबई : स्ट्रॉबेरी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात जर आपण आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश केला तर ते आपल्या शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुमच्या शरीराला बरेच फायदे मिळतात. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यात पॉलिफेनोल्स नावाचे अँटी-ऑक्सिडेंट देखील मोठ्या प्रमाणात असतात. (Eating strawberries is good for health)
-रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील हे फळ चांगले मानले जाते आणि म्हणूनच हंगामात स्ट्रॉबेरी खाणे आवश्यक आहे. जर आपण ताजे स्ट्रॉबेरी घेऊ शकत असाल, तर ते चांगले आहे. कारण स्ट्रॉबेरीचे सेवन आपल्याला हृदयरोग आणि मधुमेहपासून मुक्त करू शकते.
-स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. ज्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांनी तर अगोदर आपल्या आहारात स्ट्रॉबेरी घेतली पाहिजे. लहान मुलांना दररोज एक स्ट्रॉबेरी खाण्यासाठी दिली तर अनेक फायदे होतील .
-स्ट्रॉबेरी आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे तुमची त्वचा अधिक सुंदर आणि तरूण दिसते म्हणून ज्यांना त्वचेच्या काही समस्या असतील तर त्यांनी देखील स्ट्रॉबेरी खाणे चांगले आहे.
-स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन आणि फायबरचं प्रमाण मोठ्या असतं. यामध्ये पॉलिफेनोल्स नावाच्या अँटी-ऑक्सिडेंट देखील असतात. स्ट्रॉबेरीमध्ये सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसून कमी कॅलरीयुक्त पदार्थ असतात.
-इतकंच नाही तर हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करतं. म्हणूनच स्ट्रॉबेरी खाणं महत्त्वाचं आहे.
-सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्ट्रॉबेरी कुठल्याही प्रकारे खाऊ शकता.
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…
हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे…https://t.co/pe3zkVHUt4#BlackPepper #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
(Eating strawberries is good for health)