मुंबई : अंडी खाणे जसे आपल्या निरोगी आयुष्याठी फायदेशीर तसेच आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. अंडींमध्ये प्रथिने, जीवनसत्व ए, फोलेट, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, फॉस्फरस, कोलीन आणि सेलेनियम यासारखे सर्व पोषक घटक असतात. अंडींमध्ये अशी अनेक खनिजे आढळतात, ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. (Egg face pack is beneficial for removing wrinkles on the face)
सुरकुत्या काढून टाकण्यासाठी
अंड्यामध्ये मध मिसळा आणि दररोज चेहऱ्यावर लावा. हे आपल्या त्वचेला पोषण देईल तसेच एका आठवड्यात आपल्या चेहऱ्यावरही फरक दिसून येईल. सलग 15 दिवस हे केल्यानंतर, आपण दर दोन ते तीन दिवसांनी हे लागू शकतो. हे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते.
अंडी आणि मध फेसपॅक
अंड्यातील फक्त पिवळा बलकमध्ये एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहर्यावर लावा आणि नंतर ते पाण्याने धुवा. त्यात असलेले मध त्वचेला मॉइश्चराइझ ठेवते. हा पॅक वापरल्यानंतर तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होते.
अँटी-एजिंग फेसपॅक
अंडी फेसपॅक वृद्धत्वाचा प्रभाव लपविण्यासाठी देखील कार्य करते. कारण त्यामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. हा पॅक तयार करण्यासाठी 1 अंडे घ्या आणि त्यामध्ये 4 ते 5 थेंब तेल मिक्स करा. हे चांगले मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्याला यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा.
मुरुमांपासून मुक्त करण्यासाठी
एक चमचा संत्राच्या रसात अंडे घाला आणि चांगले मिसळा. जेंव्हा या मिश्रणाला फेस येतो तेव्हा त्यात अर्धा चमचा हळद घाला आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळाने हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा. कोरडे झाल्यानंतर ते स्क्रब करून काढा. असे काही दिवस केल्याने मुरुमांच्या समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
(टीप : वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे. उपचारांपूर्वी आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
दुधाच्या चहापेक्षा ‘ग्रीन टी’ला मिळतेय सर्वाधिक पसंती! वाचा या ‘ग्रीन टी’चा रंजक इतिहास…#GreenTea | #Health | #food | #drink https://t.co/VMbYebOZ9t
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Egg face pack is beneficial for removing wrinkles on the face)