उन्हाळ्यात कोरड्या आणि निर्जीव केसांसाठी ‘हा’ हेअर मास्क वापरा, होतील अनेक फायदे !

| Updated on: Apr 29, 2021 | 4:57 PM

उन्हाळ्यात आपले केस कोरडी आणि निर्जीव होतात. त्यामुळे केसं तुटू लागतात आणि केसांची चमकही कमी होते.

उन्हाळ्यात कोरड्या आणि निर्जीव केसांसाठी हा हेअर मास्क वापरा, होतील अनेक फायदे !
पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करण्यासाठी महिला बरेच पैसे घालतात. मात्र, आज आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस स्ट्रेट होतील. केस स्ट्रेट पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक कप दूध आणि एक अंड लागणार आहे. एक कप दुधात अंडी मिक्स करा आणि हा पॅक ब्रशने केसांवर लावा. अर्ध्या तासांसाठी पॅक केसांवर ठेवा आणि त्यानंतर फक्त शैम्पूने आपले केस धुवा. हा पॅक लावल्याने केस स्ट्रेट होतील.
Follow us on

मुंबई : उन्हाळ्यात आपले केस कोरडी आणि निर्जीव होतात. त्यामुळे केस तुटू लागतात आणि केसांची चमकही कमी होते. म्हणून उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात घामामुळे आपले केस आधिक खराब होतात. यामुळे किमान दोन दिवसांमध्ये एकदा केस धूणे आवश्यक आहे. मात्र, फक्त इतकेच करूनच आपले केस चांगले आणि सुंदर होत नाहीतर, केस उन्हाळ्यामध्येही चांगले राहण्यासाठी आज आम्ही तुम्हाला खास हेअर मास्क सांगणार आहोत. (Egg hair mask is beneficial for dry and lifeless hair)

6 चमचे दही

2 अंडी

1 चमचा लिंबाचा रस

3 चमचा मध

सर्वात अगोदर अंडी फेटून घ्या आणि यात दही मिक्स करा. दही आणि अंडी व्यवस्थित फेटून झाल्यावर त्यात लिंबू रस आणि मध मिसळा. यामुळे स्काल्पची नीट स्वच्छता होते. या मिश्रणाला व्यवस्थित केसांमध्ये लावून घ्या आणि 30 मिनिटे थांबा. यानंतर केसांना व्यवस्थित शॅम्पू आणि कंडीशनर लावून स्वच्छ धुवून घ्या.

कोरफड आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे केवळ आपल्या त्वचेची काळजी घेत नाही, तर आपल्या केसांसाठीही फायदेशीर ठरतात. यामुळे आपले केस चमकदार होतात. कोरफडयुक्त हेअर कंडिशनर बनवण्यासाठी, प्रथम कोरफडच्या पानांतून गर काढा. आता एक चमचे लिंबाचा रस, 4 चमचे कोरफड जेलमध्ये घाला. आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे आपल्या केसांवर तसेच राहू द्या. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने आपले केस स्वच्छ करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Egg hair mask is beneficial for dry and lifeless hair)