मुंबई : ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांना बऱ्याच काळापर्यंत आरोग्या संबंधी समस्या होण्याची शक्यता असते (Erectile Dysfunction In Corona Patients). त्यासोबतच इरेक्टाईल डिसफंक्शनची (Erectile Dysfunction) समस्याही उद्भवू शकते. आरोग्य विशेषज्ञांनी हा खुलासा केला आहे (Erectile Dysfunction In Corona Patients).
संसर्गजन्य रोग विशेषज्ज्ञ डॉक्टर डेना ग्रेयसन यांच्या मते, या रोगामुळे (Corona Virus) पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. मग भलेही ते कोरोना मुक्त झाले असेल तरी त्यांच्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होईल. कोरोना झाल्यानंतर पुरुषांमध्ये अनेक काळापर्यंत इरेक्टाईल डिसफंक्शनची समस्या राहील.
कोरोना विषाणूची लागण तुम्हाला झाल्यानंतर भलेही तुम्ही त्यातून मुक्त झालात. तरी बऱ्याच काळापर्यंत तो तुमच्या आयुष्यात राहील आणि त्यामुळे तुमच्या जीवनात अनेक बदल होतील. त्यापैकीच एक म्हणजे इरेक्टाईल डिसफंक्शन आहे. त्याशिवाय, इतरही काही समस्या उद्भवू शकतात.
कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर इरेक्टाईल डिसफंक्शनची शक्यता वाढून जाते. इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजे जेव्हा एखादा पुरुष स्वत: संभोग करण्यासाठी तयार करु शकत नाही किंवा तो इरेक्ट करु शकत नसे, तर या स्थितीला इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणतात (Erectile Dysfunction In Corona Patients).
यामुळे तुमच्या जीवनात तणाव, आत्मविश्वासाची कमतरता आणि नात्यात कटुता आणू शकते. त्यामुळे अशा वेळी तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज असते. त्यासाठी डॉक्टर्स तुम्हाला योग्य ती औषधं आणि इतर काही पर्यायही देऊ शकतात.
डॉक्टरांसमोर आपली समस्या सांगण्यात नक्कीच तुम्हाला संकोच वाटेल. पण, जर तुम्हाला ही समस्या उद्भवली असेल तर तुम्हाला डॉक्टरांची मदत नक्कीच घ्यायला हवी. तेव्हाच तुम्ही या समस्येवर उपाय करुन आपलं जीवन आनंदाने घालवू शकाल.
इरेक्टाईल डिसफंक्शनचे दोन प्रकार असतात
Corona | घरी राहा किंवा बाहेर, सोशल डिस्टन्सिंग कोरोनापासून बचावाचा एकमेव उपाय, संशोधकांचा दावा!https://t.co/0Nuvym4mgA#coronavirus #SocialDistancing
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020
Erectile Dysfunction In Corona Patients
संबंधित बातम्या :
Mushroom | ‘व्हिटामिन डी’चा नैसर्गिक स्त्रोत, जाणून घ्या ‘मशरूम’ खाण्याचे फायदे…
Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!
Food | वजनासहित रक्तदाब कमी करण्यासाठी गुणकारी ‘बीट’, जाणून घ्या 10 फायदे!