कानातील मळ काढावा की नाही? तज्ज्ञांनी दिले तुमच्या प्रश्‍नाचे उत्तर

| Updated on: Apr 11, 2022 | 11:28 AM

लोकांना अनेकदा कानातील मळ काढताना आपण बघत असतो. कान स्वच्छ करण्यासाठी त्यांच्याकडून चावी, आगपेटीची काडी तसेच मिळेल त्या वस्तूंचा वापर होत असतो. परंतु कान साफ ​​करणे हे अत्यंत धोकादायक ठरु शकते. कानात तयार होणारा हा मळ नेमकं काय काम करतो? कानातील मळ काढावा की नाही? या प्रश्‍नांची उत्तरे या लेखातून पाहणार आहोत.

कानातील मळ काढावा की नाही? तज्ज्ञांनी दिले तुमच्या प्रश्‍नाचे उत्तर
कानातील मळ काढावा की नाही?
Image Credit source: Tv9
Follow us on

आपल्या शरीराचे काही भाग अतिशय नाजूक असतात, त्यामुळे त्यांची स्वच्छता करताना अतिशय काळजीपूर्वक काम करावे लागत असते. अशाच नाजूक अवयवांतील एक म्हणजे, कान. आपण अनेकदा लोकांना वारंवार कान चुळचुळ किंवा साफ करताना बघत असतो. परंतु या सवयीमुळे (Habits) अनेकदा गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. अनेक जण रस्त्यांवर फिरणार्या काही लोकांकडूनही कानातील मळ काढत असतात. परंतु कान स्वच्छ (Ears cleaning) करण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण तरीही तुम्ही कान स्वच्छ करून कानातला मळ काढण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही याबाबत खबरदारी बाळगली पाहिजे. कान स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे, हे तज्ज्ञांच्या (Expert) मार्गदर्शनाखाली राहून केले पाहिजे.

कानात मळ का तयार होतो?

कानात तयार झालेला मळ निरुपयोगी समजून लोक त्याला काढण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कानांमध्ये मळ तयार होणे सामान्य बाब आहे. या मळामुळे कानांचे संरक्षण होत असते. कानातील मळ हा कानांना कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करतो. मळाची कमतरता असल्यास आपले कान खूप कोरडे होतात आणि त्यांना चुळचुळ सुटत असते. कानातील मळामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असल्याने आपले कानच स्वतःची स्वच्छता करतात. मळ हा कानांसाठी फिल्टर म्हणून काम करते. आपल्या कानांना धूळीपासून वाचवण्यासोबतच ते अनेक घटकांना कानात जाण्यापासून प्रतिबंधित करतात. जेव्हा आपण काही खातो तेव्हा जबडा हलवताना कानातला मळ सुकतो आणि स्वतःच कानातून बाहेर येतो. मळ हा कानाच्या आतील भागात नसून बाहेरील भागात बनवलेला असतो. जेव्हा तुम्ही कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करता तेव्हा कानातला मळ आणखी आत जाते. कापूस किंवा कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने कान स्वच्छ केल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते, ते पुढील प्रमाणे :

1) कानातला गंभीर संसर्ग.
2) कानाच्या पडद्याला दुखापत
3) कमी ऐकू येणे.

कानाची स्वच्छता कशी करावी?

आपण आपले कान स्वच्छ करण्याची काहीही आवश्‍यकता नसते. परंतु जर तुमच्या कानात खूप मळ झाला असेल आणि कानातील नळ्या ब्लॉक झाल्या असतील तर त्या स्वतः साफ करण्याऐवजी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. जेव्हा कानाच्या नळ्यांमध्ये मळ पूर्णपणे भरला जातो तेव्हा या समस्येला ‘सेरुमेन इन्फेक्शन’ म्हणतात.

सेरुमेन संसर्गाची लक्षणे

* कानांमध्ये वेदना होणे
* कधीकधी ऐकण्यात अडचण येते, कालांतराने ही समस्या आणखी वाढू शकते.
* कानात आवाज येणे.
* कानाला खाज सुटणे आणि वास येणे.

असा स्वच्छ करावा कान

कान स्वच्छ करण्यासाठी पहिल्यांदा स्वच्छ कापड वापरा. तुम्ही बेबी ऑइल, मिनरल ऑइल किंवा ग्लिसरीनचे काही थेंब कानात टाकू शकता. याशिवाय तुम्ही ‘वॅक्स रिमूव्हल किट’ देखील वापरू शकता. दरम्यान, कान स्वच्छ करण्यासाठी पुढील गोष्टी वापरू नका : कान स्वच्छ करण्यासाठी तीक्ष्ण वस्तू आणि कॉटन इअर बड्स वापरणे टाळा. या गोष्टींच्या वापरामुळे समस्या दूर होत नाही, तर ती आणखी वाढून जखम होउ शकते.

हेही वाचा:

Skin Care : उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवायचे आहे? मग हे घरगुती उपाय करा आणि फरक पाहा!

Health : आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी फक्त या 4 टिप्स फाॅलो करा आणि रोगांना दूर ठेवा!