मुंबई : सुंदर दिसायला कोणाला नको असत, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतो. परंतु, सौंदर्य केवळ मेकअप आणि कपड्यांमधूनच येत नाही, तर यासाठी त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसणे देखील महत्वाचे आहे. जर, त्वचा चांगली नसेल तर चेहऱ्यावरचा मेकअप फार चांगला दिसत नाही.(Extremely beneficial for rock salt face pack skin)
मुळात आपली त्वचाच तजेलदार आणि सुंदर असणे आवश्यक असते. चला तर, त्वचा सुधारण्यासाठीच्या काही नैसर्गिक टिप्स जाणून घेऊया. खडेमीठ खाणे आपल्या अत्यंत फायदेशीर आहे. अडे मीठ खाल्ल्याने आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की, खडेमीठ आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. दोन चमचा बारीक खडेमीठ घ्या त्यामध्ये तीन चमचे दही आणि लिंबाचा रस मिसळा आणि दहा मिनिटांनंतर आपल्या चेहऱ्यावर लावा.
त्यानंतर चेहऱ्यावरील पेस्ट सुकल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे आपला चेहरा तजेलदार दिसेल. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन वेळा लावला पाहिजे. फेसपॅक बनविण्यासाठी कॉफी पावडर एक चमचा मधात व्यवस्थित मिसळा आणि हातांनी हलक्या हाताने मसाज करा. यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी पॅक चेहऱ्यावर ठेवा. मग आपले तोंड धुवा. खरं तर, कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, तसेच यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार बनते आणि चेहर्यावरील सुरकुत्याची समस्या दूर होते.
हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावला पाहिजे. सर्वांत अगोरद अर्धी वाटी तांदूळ घ्या आणि ते बारीक करून घ्या. त्यामध्ये ताजे दही घाला ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर 30 ते 40 मिनिटे तसेच ठेवा आणि हा पॅक सुकल्यानंतर चेहऱ्यावर हात फिरवा यामुळे तुमचे स्क्रब देखील होईल. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा याचा फायदा त्वचेला होईल. आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा ही पेस्ट चेहऱ्याला लावा.
(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Extremely beneficial for rock salt face pack skin)