मुंबई : फॅटी लिव्हरची समस्या ही आपल्या आधुनिक जीवनशैलीची उत्पत्ती आहे. यामुळे पीडित रूग्णांच्या यकृतामध्ये सूज येते, ज्यामुळे पोट फुगी, श्वासात दुर्गंधी, वजन कमी होणे आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवतात. काही लोकांचा असा समज आहे की, फॅटी लिव्हरची समस्या जास्त मद्यपान केल्यामुळे होते. परंतु, हे खरे नाही, बर्याच प्रकरणांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या चुकीच्या खाण्यामुळे देखील उद्भवते. जर वेळेवर उपचार केले गेले नाहीत तर ही समस्या एक गंभीर रूप धारण करू शकते (Fatty Liver problem know the symptoms, causes and precautions).
तज्ज्ञांच्या मते, फॅटी लिव्हर या आजारामध्ये अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर अशी दोन प्रकारची समस्या आहे. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर समस्या जास्त मद्यपान किंवा इतर औषधांच्या सेवनमुळे उद्भवते. तर, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर समस्या लठ्ठपणा, रक्तातील उच्च साखर, पीसीओएस आणि खराब आहार यामुळे उद्भवते.
फॅटी लिव्हरच्या स्थितीत, यकृतामध्ये चरबी जमा झाल्यामुळे ते सूजते आणि यकृताचे कार्य धीमे होते. अशा परिस्थितीत, अन्नामध्ये उपस्थित चरबी पचन करण्यास शरीर सक्षम राहत नाही. यामुळे भूक न लागणे, वजन कमी होणे, अशक्तपणा, कंटाळा येणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, त्वचेवर खाज सुटणे, डोळे व त्वचेचा रंग बदलणे, ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणे उद्भवतात.
फॅटी लिव्हर ही समस्या अल्कोहोलिक आही की नॉन अल्कोहोलिक ते जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. वेळीच यावर योग्य उपचार न केल्यास लिव्हर सिरोसिसची समस्या उद्भवू शकते, जी नंतर कर्करोगाचे रूप धारण करू शकते.
– सिगारेट, अल्कोहोल किंवा इतर कोणतेही मादक पदार्थ पूर्णपणे टाळा.
– फॅटी लिव्हरच्या रूग्णांनी जास्त प्रमाणात मीठ खाणे देखील चांगले नाही. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने शरीरात जास्त पाणी साठते, जे फॅटी लिव्हरच्या रूग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.
– फॅटी लिव्हर रुग्णांनी गोड गोष्टी जास्त खाऊ नयेत. टॉफी, चॉकलेट, फळांचा कृत्रिम रस, सोडा इत्यादी पदार्थ टाळा (Fatty Liver problem know the symptoms, causes and precautions).
– फॅटी लिव्हरच्या रूग्णांनी पांढर्या ब्रेडचे सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच हे पचविणे देखील थोडे कठीण आहे.
– जर आपण फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर आपण लाल मांस खाऊ नये. यात संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे आपली समस्या वाढू शकते.
– तेलात अधिक चरबी आणि कॅलरीज असतात म्हणून फॅटी लिव्हर रुग्णांनी तेलकट, तळलेले आणि जंक फूड खाऊ नये.
– नियमित व्यायामाची सवय लावा. याशिवाय दररोज अन्न घेतल्यानंतर थोडावेळ चाला.
– हलके आणि सहज पचण्याजोगे अन्न खाण्याची सवय लावा. बाहेरील जंकफूड्स, फास्ट फूड, साखर पेये आणि अधिक मसालेदार खाणे टाळा.
– संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या, फळे आणि सॅलड्स खाणे ही सवय लावून घ्या. जर वजन जास्त असेल तर ते कमी करा.
– आपण फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त असल्यास तज्ज्ञांनी दिलेली औषधे वेळेत घ्या आणि त्याच्या सूचनांचे अनुसरण करा.
(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Fatty Liver problem know the symptoms, causes and precautions)
आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर दही, उन्हाळ्यात अशा प्रकारे करा उपयोग
Belly Fat । पोटातील चरबी कमी करण्यास बदाम उपयुक्त, जाणून घ्या एका दिवसात किती बदामांचे सेवन करावे? https://t.co/XufHqvrmmP #BellyFat | #Almonds | #HealthCare | #HealthTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 10, 2021