मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. कोरोना रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग जेवढे महत्वाचे आहे तेवढेच या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. (Fenugreek and amla juice are beneficial for boosting the immune system)
या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढा, हर्बल टी आणि मल्टी व्हिटॅमिन घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला आवळा आणि मेथीचा रस याबद्दल सांगणार आहोत. हा रस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सध्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाणे महत्वाचे आहे.
आवळा
आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बूस्टर म्हणून ओळखला जातो. त्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय आपळ्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे संक्रमण रोखण्यात मदत करतात. मात्र, बाजारात मिळणारी आवळा पावडर शक्यतो वापरणे टाळा. कारण त्या पावडरवर प्रक्रिया केलेली असते. शक्यतो आवळ्याचा वापर जास्तीत-जास्त केला पाहिजे.
मेथी
मेथीमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडेंट असतात. आवळा मिसळून खाल्ल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. तसेच, रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत आहे. मेथी आणि आवळ्याचा रस आपण दिवसामधून कितीही वेळा घेऊ शकतो. हा रस घेणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
आवला आणि मेथीचा रस
1. एक चमचे मेथीची पावडर किंवा मेथीचे पाने घ्या
2. एक आवळा घ्या
3. अर्धा ग्लास पाणी घ्या
तयार करण्याची पध्दत
हे पेय तयार करण्यासाठी सर्व गोष्टी व्यवस्थित किसून घ्या आणि अर्धा कप पाणी घाला. हे मिश्रण चांगले चाळा आणि दररोज सकाळी प्या. हे पिण्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. मात्र, शक्यतो हे पेय जेवण करताना घेऊ नका. सकाळी, दुपारी अथवा संध्याकाळी हे पेय घेतलेले चांगले
संबंधित बातम्या :
चपाती खाल्यानंतर ‘ही’ चूक अजिबात करु नका, आरोग्यास होऊ शकतं नुकसानhttps://t.co/YhmdUa5Ut6 #HealthTips | #Health | #Lifestyle | #Tv9Marathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 31, 2020
(Fenugreek and amla juice are beneficial for boosting the immune system)