मुंबई : महिलांचे सुंदर डोळे त्यांच्या सुंदरतेत भर घालत असतात. प्रत्येक महिलेला मोठे आणि सुंदर डोळे आवडतात. तुमच्या सुंदर डोळ्यांमुळे प्रत्येक जण तुमच्याकडे आकर्षित होतो. आजकाल मुली आपल्या ड्रेसनुसार डोळ्यांचा मेकअप करतात. विशेषतः लग्न समारंभात मुलींना डोळ्यांना स्मोकी लुक द्यायला आवडते. हा आय मेकअप तुम्हाला स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक देतो. (Follow these homemade tips to remove eye makeup)
हल्ली स्मोकी आय मेकअपचा ट्रेंड आहे. मात्र, डोळ्याचा केलेला मेकअप काढताना अनेकांना समस्या निर्माण होतात. डोळ्याचा मेकअप नेमका कसा काढावा हे कळत नाही. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही डोळ्याचा मेकअप व्यवस्थितपणे काढू शकता.
-आपले डोळे खूप संवेदनशील असतात. यामुळे शक्यतो कापसाने किंवा मेकअप रीमूव्हरचा वापर करून आपण डोळयांवरचा मेकअप काढू शकतो.
-डोळ्यांवरील मेकअप काढण्यासाठी आपण तेलाचा उपयोग देखील करू शकता. डोळ्यांचा मेकअप काढून टाकण्यासाठी तुम्ही नारळ तेल, ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. हे तेल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. आपण ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी वापरू शकता.
-आपण लेन्सेस वापरत असल्यास तर मेकअप काढून टाकण्याच्या अगोदर लेन्सेस काढा. अन्यथा आपले डोळे खराब होऊ शकतात. हे लक्षात ठेवा की जर आपण लेन्स लावत असाल तर डोळ्यांवर आॅईली मेकअप करू नका.
-बरेच लोक मेकअप आणि लिपस्टिक काढण्यासाठी व्हॅसलीनचा वापर करतात. पण हे शक्यतो करणे टाळा कारण यामुळे आपली त्वचा तेलकट होऊ शकते आणि आपल्या चेहऱ्यावर मुरूम देखील येऊ शकतो. डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी व्हॅसलीनचा वापर करू नका.
-वॉटरप्रूफ मेकअप काढण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. मात्र, असे न करता आपण वॉटरप्रूफ मेकअप काढण्यासाठी बेबी शैम्पू वापरू शकता.
संबंधित बातम्या :
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
HEALTH | ‘कोरोना’च्या धसक्याने जीवनशैलीत चांगले बदल, पावसाळी आजारांत 50% घट!
Weight Loss | वजन वाढवण्यासाठीच नव्हे तर, वजन कमी करण्यासाठीही ‘केळी’ फायदेशीर!#weightloss | #weightlossdiet | #Banana | #food https://t.co/Qrrqlm9y5A
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 19, 2021
(Follow these homemade tips to remove eye makeup)