मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. मात्र, होळी म्हटंले की, आपण त्वचेची कुठल्याही प्रकारची काळजी न घेता साजरी करतो. वेगवेगळ्या रंगामुळे आपली त्वचा आणि केस बऱ्याच वेळा खराब होते. मात्र, आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही कितीही रंग खेळला तरी त्याचे कुठलेही नुकसान तुमच्या त्वचेला आणि केसांना होणार नाही. (Follow these tips before going to celebrate Holi)
-होळी खेळायला जाण्यापूर्वी चेहऱ्याला सनस्क्रीन अवश्य लावावं. त्यामुळे रंग आणि आपली त्वचा या दरम्यान एक लेअर तयार होते. त्यामुळे त्वचेला अधिक नुकसान होत नाही. होळी खेळायला जाण्यापूर्वी 20 मिनीट अगोदर सनस्क्रीन लावावं.
-एक चमचा हळद आणि दोन चमचे हरभरा डाळीचे पीठ घ्या आणि त्यात एक चमचे मलई आणि थोडे दूध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. हे मिश्रण कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. याशिवाय तुम्ही दही आणि हरभरा पीठ घालून लावू शकता.
-दही
-डाळीचे पीठ
-एलोवेरा जेल
-तांदळाचे पीठ
-गुलाब पाणी
-आवळा पावडर
हे सर्व एकत्र मिक्स करा त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या आणि केसांना 30 ते 40 मिनिटे ठेवा.
-होळी खेळायला जाण्यापूर्वी केसांसोबतच चेहऱ्यालाही तेल लावावं. होळी खेळण्याच्या 1 तास पहिले असं करा, ज्यामुळे तेल स्कीनमध्ये मुरलेलं असेल. त्यामुळे रंगांमध्ये असलेले नुकसानदायक केमिकल्स आपल्या त्वचेला इजा पोहोचवू शकणार नाहीत आणि रंग सहजपणे निघतील.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायकhttps://t.co/y89Pxceis3#VitaminD #FoodSupplement
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020
(Follow these tips before going to celebrate Holi)