Holi 2021 | होळीच्या रंगानी चेहरा निस्तेज झाल्यावर ‘या’ उपायांनी परत आणा चेहऱ्याची चमक

| Updated on: Mar 21, 2021 | 7:07 AM

होळी म्हणजे रंगांचा उत्सव... विविध रंगांची उधळण करताना आपण आपल्या त्वचेकडे दुर्लक्ष करतो.

Holi 2021 | होळीच्या रंगानी चेहरा निस्तेज झाल्यावर या उपायांनी परत आणा चेहऱ्याची चमक
Follow us on

मुंबई : होळी म्हणजे रंगांचा उत्सव… विविध रंगांची उधळण करताना आपण आपल्या त्वचेकडे दुर्लक्ष करतो. पण याचा खूप वाईट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. कारण अनेक रंगांमध्ये केमिकल्स मिसळली असतात. प्रत्येकच जण नैसर्गिक रंगांचा वापर करतात असं नाही. तेव्हा होळीला रंग खेळण्यासाठी जाण्यापूर्वी आणि रंग खेळून आल्यानंतर चेहऱ्यावरील रंग कसा काढायचा यासाठी खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात खास टिप्स…(Follow these tips before going to play Holi)

-एक चमचा हळद आणि दोन चमचे हरभरा डाळीचे पीठ घ्या आणि त्यात एक चमचे मलई आणि थोडे दूध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. हे मिश्रण कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. याशिवाय तुम्ही दही आणि हरभरा पीठ घालून लावू शकता.

– तेल आणि गुलाब जल दोन्ही मुल्तानी मिट्टी पावडरमध्ये मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला साधारण वीस मिनिटे ठेवा. यामुळे होळीचा रंग तुमच्या चेहऱ्यावरून निघून जाईल.

-होळी खेळायला जाण्यापूर्वी चेहऱ्याला सनस्क्रीन अवश्य लावावं. त्यामुळे रंग आणि आपली त्वचा या दरम्यान एक लेअर तयार होते. त्यामुळे त्वचेला अधिक नुकसान होत नाही. होळी खेळायला जाण्यापूर्वी 20 मिनीट अगोदर सनस्क्रीन लावावं.

-होळी खेळायला जाण्यापूर्वी केसांसोबतच चेहऱ्यालाही तेल लावावं. होळी खेळण्याच्या 1 तास पहिले असं करा, ज्यामुळे तेल स्कीनमध्ये मुरलेलं असेल. त्यामुळे रंगांमध्ये असलेले नुकसानदायक केमिकल्स आपल्या त्वचेला इजा पोहोचवू शकणार नाहीत आणि रंग सहजपणे निघतील.

संबंधित बातम्या : 

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Follow these tips before going to play Holi)