त्वचेची नैसर्गिक चमक परत आणण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करून पाहा !

| Updated on: May 16, 2021 | 7:36 AM

बऱ्याच लोकांची विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावरील चमक जाते. याशिवाय अगदी लहान वयातच काही लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.

त्वचेची नैसर्गिक चमक परत आणण्यासाठी हे उपाय नक्की करून पाहा !
फेसपॅक
Follow us on

मुंबई : बऱ्याच लोकांची विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावरील चमक जाते. याशिवाय अगदी लहान वयातच काही लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. बदलत्या हंगामात चेहऱ्यावर रुक्षपणा वाढल्यामुळे अनेक अडचणी उद्भवतात. अशा परिस्थितीत, आपण आपल्या आहारात काही खास फळांचा आणि पदार्थांचा समावेश केला पाहिजे आणि काही घरगुती उपाय करून देखील आपण चेहऱ्यावरील गेलेली चमक परत मिळू शकता. (Follow these tips for beautiful skin)

दह्यामध्ये नैसर्गिक अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. आपण इच्छित असल्यास, दह्याचा फेस मास्क तयार करून तो लावू शकता, यामुळे आपली मुरुमांची समस्या कमी होईल. याशिवाय मुरुमांमुळे येणारी खाज देखील दूर होईल. दहीमध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत जे डोक्यातील कोंडा आणि स्काल्पशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यामुळे खाज सुटण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी, दह्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला. या मिश्रणाने आपल्या स्काल्पची मालिश करा आणि कोरडे होऊ द्या. तांदळाचे पीठ टॅनिंग काढून टाकून आपल्याला नैसर्गिक चमक देते. यासाठी तांदळाच्या पिठामध्ये एक चमचा कच्चे दूध आणि कोरफड जेल घालावे आणि हलके हातांनी चेहरा व्यवस्थित स्क्रब करावा आणि उर्वरित फेस पॅक 10 मिनिटांसाठी संपूर्ण चेहऱ्यावर लावावा. यानंतर आपला चेहरा खूप चमकेल.

आपल्या चेहर्‍यावरील डाग दूर करण्यास बटाटे उपयुक्त आहे. 2 चमचा बटाटाचा रस, 2 चमचा काकडीचा रस, 1 चमचा लिंबूचा रस आणि हळद हे सर्व साहित्य मिक्स करा आणि चेहऱ्यावर चांगले लावा. हे चेहऱ्यावर लावल्यानंतर साधारण पंधरा मिनिटे तसेच ठेवा ते कोरडे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हे लावले पाहिजे. जर खरोखरच आपण आपल्याला चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवायचा प्रयत्न करत असाल, तर प्रथम आपल्या खाण्याच्या सवयीत सुधारणा करणे आवश्यक आहे.

केवळ या सवयी बदलल्यानंतरच, कोणताही घरगुती उपचार आपल्या त्वचेवर प्रभावी ठरू शकतो. यासाठी बाहेरील खाद्यपदार्थ, जंकफूड आणि फास्टफूड खाणे शक्यतो टाळा.चहाऐवजी अँटीऑक्सिडंटनी समृद्ध ग्रीन टी पिण्यास सुरुवात करा. हे अँटीऑक्सिडंट चेहरा आणि त्वचा उजळ करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. याशिवाय हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे भरपूर प्रमाणात सेवन करा. मोड आलेले कडधान्य खा आणि भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

संबंधित बातम्या : 

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(Follow these tips for beautiful skin)