मुंबई : उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे त्वचा तेलकट, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. आपल्या त्वचेच्या देखभालीत लहानसे बदल करा. आपल्या त्वचेला हवामानाशी जुळवून घेण्याची संधी द्या. उन्हाळ्याच्या हंगामात नेमकी त्वचेची काळजी कशी घ्यायची याबद्दल आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. (Follow these tips to get rid of dead skin)
-तांदळाचे जाडसर पीठ तयार करण्यासाठी चार ते पाच चमचे तांदूळ घ्या आणि जाडसर वाटा. या पेस्टमध्ये दूध मिक्स करा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर स्क्रब प्रमाणे लावा. चेहऱ्यासोबत मानेवरही लावा. हलक्या हाताने गोलाकार दिशेमध्ये तीन ते चार मिनिटांसाठी त्वचेचा मसाज करावा. पेस्ट पूर्णपणे सुकू द्यावी. यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.
-तांदळामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन-डी, फायबरसह अन्य पोषण तत्त्वांचा मात्रा भरपूर असते. याव्यतिरिक्त तांदळामध्ये लोह आणि थायमीन यासारख्या तत्त्वांचाही समावेश आहे. यामुळेच तांदळाचे आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक फायदे देखील आहेत. तांदळाच्या पिठामुळे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवरील दुर्गंध स्वच्छ होण्यास मदत मिळते.
-तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या उपचारांसाठीही वापरले जातात. तांदळाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा तांदळाचे जाडसर पीठ आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर स्क्रबप्रमाणे लावा आणि काहीवेळाने धुवून टाका.
(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Follow these tips to get rid of dead skin)