मुंबई : वजन कमी व्हावे (weight loss), असे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असते. जेव्हा वजन कमी करण्याचा विचार केला जातो, तेव्हा अनेकदा हेवी वर्कआउट्स आणि डाएटिंगचा सल्ला दिला जातो. परंतु, यामुळे आपल्याला स्लिम-ट्रिम बॉडी मिळेलच, असे नाही आणि हे करणे प्रत्येकालाच शक्य होईल असे देखील नाहीये. (Follow these tips to lose weight)
आपले वजन वाढले तर आपल्याला अनेक आजार देखील होऊ शकतात. वजन कमी करायचे असेल तर सर्वात अगोदर आपल्याला खाण्यावर नियंत्रण ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. मात्र, वजन कमी करण्यासाठी नेमके काय खायला पाहिजे किंवा नको ते बऱ्याच लोकांना समजत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, वजन कमी करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे.
-वजन कमी करण्यासाठी आपल्याला आपले आवडते पदार्थ सोडण्याची काहीच गरज नाही. फक्त ते योग्य प्रमाणात खा. एका लहान प्लेटमध्ये अन्न घ्या आणि खाण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या. पाण्यामुळे तुमची भूक शांत होईल आणि तुम्ही कमी प्रमाणात अन्न खाल.
-वजन कमी करण्यासाठी पाणी हे सर्वोत्तम पेय आहे. पाणी आपल्याला केवळ हायड्रेटेडच ठेवतच नाही, तर आपले पोटदेखील भरते. यामुळे बराच काल भूक लागत नाही. शिवाय त्यात कॅलरीही नसतात. याने आपल्या शरीराचा द्राविक समतोल राखला जातो.
-अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांसह समृद्ध, ग्रीन टी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात आणि शरीराचे विविध संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. ग्रीन टीमध्ये आढळणारे हे अँटीऑक्सिडेंट्स आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात.
-आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी दररोज चालण्याची सवय लावावी लागणार आहे. त्यामध्ये ही फास्ट चालण्याची सवय लावावी यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. जिममध्ये न जाता केवळ चालून आपण आपले वजन कमी करू शकतो. दररोज शक्य असेल तेवढे जास्त चला
संबंधित बातम्या :
तुम्ही अंडी खाण्याचे शौकीन आहात? मग ही बातमी वाचा https://t.co/RvhTrYfMm4 @GoodEggs #eggs #eggschoice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2020
(Follow these tips to lose weight)