Beauty Tips : लिक्विड लिपस्टिक लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…

| Updated on: May 03, 2021 | 1:04 PM

मुली आणि महिलांना लिपस्टिक लावायला आवडते. बाजारात विविध प्रकारची लिपस्टिक उत्पादने आणि शेड्स उपलब्ध आहेत.

Beauty Tips : लिक्विड लिपस्टिक लावताना या गोष्टी लक्षात ठेवा...
मास्कच्या आत अशी काळजी घ्या लिपस्टिकची, वापरा हे मेकअप हॅक्स
Follow us on

मुंबई : मुली आणि महिलांना लिपस्टिक लावायला आवडते. बाजारात विविध प्रकारची लिपस्टिक उत्पादने आणि शेड्स उपलब्ध आहेत. विशेषतः मुलींना लिक्विड लिपस्टिक आवडते. ही लिपस्टिक जास्त काळ टिकते आणि त्याचा रंगही चांगला असतो. लिक्विड लिपस्टिक लावण्यासाठी थोडी अवघड असते. ही लिपस्टिक लावताना अनेकवेळा चुका देखील होतात. जर लिक्विड लिपस्टिक लावताना तुमच्याकडूनही काही चुका होत असतील तर या टिप्स फाॅलो करा (Follow these tips when applying liquid lipstick)

-लिक्विड लिपस्टिक लावणे काही सेकंदात होत नाही. ही लिपस्टिक लावण्यासाठी आपल्याकडे वेळ असावा. आपण कारमध्ये ही लिपस्टिक लावू शकत नाही. शांत ठिकाणी आणि लिक्विड लिपस्टिक लावताना आपण हलणार नाही यांची काळजी घ्या.

-लिक्विड लिपस्टिक लावण्यापूर्वी लाइट मेकअप करावा लागतो. आपण ते लावण्यापूर्वी चेहऱ्यावर मेकअप बेस आणि फाउंडेशन वापरू शकता, यामुळे आपला चेहरा विचित्र दिसणार नाही. आपण गालावर लिप कलर मॅचिंग ब्रश देखील लावू शकता. यामुळे आपला लूक अधिक चांगला दिसेल.

-लिक्विड लिपस्टिकचा फक्त एक कोट पुरेसा आहे. लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठ पूर्णपणे स्वच्छ करा. असे केल्याने आपल्या लिपस्टिकचा रंग व्यवस्थित दिसेल. जर लिपस्टिक आपल्याला डार्क पाहिजे असलेतर आपण अतिरिक्त कोट लावू शकता.

-जर तुमचे ओठ क्रॅक झाले असती तर प्रथम मृत त्वचा काढून टाका आणि त्यानंतर मॉइश्चराइझ करा. थोड्या काळासाठी लिप बाम लागू ठेवा आणि नंतर लिपस्टिक लावा. प्रथम खालच्या ओठात नेहमी लिपस्टिक लावा. नंतर ओठ दाबा जेणेकरून लिपस्टिक चांगली मिसळेल.

संबंधित बातम्या : 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Follow these tips when applying liquid lipstick)