मुंबई : उन्हाळ्याची चाहुल लागली की, प्रत्येकजण आंब्याची वाट बघतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. मात्र, आंबा खाल्ल्याने वजन वाढते, म्हणून अनेकजण आंबे खाणे टाळतात. मात्र, काही गोष्टी आपण कटाक्षाणे पाळून आंबे खाऊ शकतो. यामुळे आपले वजन देखील वाढणार नाही. (Follow these tips when including mango in your diet)
वर्कआउटनंतर आंबे खाऊ नका
वर्कआउटनंतर शक्यतो आंबे खाणे टाळा. त्यात जास्त प्रमाणात कॅलरी असतात. जर तुम्हाला आंबे खायचे असतील तर वर्कआउट करण्यापूर्वी थोडा वेळ अगोदर खा. यामुळे आपले वजन देखील वाढणार नाही.
रात्री आंबे खाणे टाळा
कधीही सकाळी किंवा दुपारी आंबे खाल्ले पाहिजेत. रात्रीच्यावेळी आंबे खाणे टाळाच, आंबे खाऊन झोपल्यावर वजन वाढण्याची शक्यता असते. यामुळे सकाळी किंवा दुपारी आंबे खा.
खाण्याचे प्रमाण ठरवा
अनेकांना आंबे इतके आवडतात की, दिवसभर ते आंबेच खातात. मात्र, असे करणे देखील चुकीचे आहे. दिवसातून जास्तीत-जास्त पाच आंबे खा त्यापेक्षा अधिक आंबे खाणे टाळाच.
आंबे खाल्ल्याने ऊर्जा मिळते
आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.
आंब्यामध्ये ए,बी जीवनसत्वे
आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Follow these tips when including mango in your diet)