Diet Hack Weight loss : वजन कमी करण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा !

| Updated on: May 05, 2021 | 12:38 PM

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करतात. त्यामध्ये अनेकांना वाटते की, अन्न न खाल्ल्यामुळे आपले वजन कमी होऊ शकते तर आपण चुकीचे आहात.

Diet Hack Weight loss : वजन कमी करण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा !
वाढलेले वजन
Follow us on

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करतात. त्यामध्ये अनेकांना वाटते की, अन्न न खाल्ल्यामुळे आपले वजन कमी होऊ शकते तर आपण चुकीचे आहात. त्याऐवजी आपण निरोगी गोष्टी खाव्या. आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल करा. दररोज कॅलरीचे सेवन देखील नियंत्रित करा. या सर्व गोष्टी केल्यास आपले वजन वेगाने कमी होईल. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल. (Follow special tips for weight loss)

-वजन कमी करण्यासाठी आपण आहारात फळांचा रस घेतो. मात्र, तसे करण्यापेक्षा सरळ-सरळ फळेच खावीत. यामुळे कॅलरीचे प्रमाण कमी होते. याशिवाय फळ खाल्ल्याने टाइप -2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो असा दावा एका अभ्यासानुसार करण्यात आला आहे.

-जास्त खाल्ल्याने जास्त कॅलरी आणि अनावश्यक वजन वाढते. पुरेशा प्रमाणात खाल्ल्याने तुमचे वजन वाढत नाही आणि कॅलरी देखील नियंत्रणात असतात. या सवयीचा अवलंब केल्याने आपण काही दिवसांमध्येच वजन कमी करू शकतो.

-जेवण झाल्यानंतर काही वेळेने आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ते खाणे टाळा कारण त्यामुळे कॅलरी जास्त वाढण्याची शक्यता असते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पाणी प्या. पाणी पिण्यामुळे केवळ तहान भागत नाहीतर भूक देखील कमी लागेल.

-आपल्याला असे वाटत असेल की उपासमार करून आपण वजन कमी करू शकतो. आपण चुकीचा विचार करत आहात. त्याऐवजी आपण थोडया- थोड्या वेळाने खाल्ल्ये पाहिजेत. यामुळे आपल्याला अनावश्यक भूक लागणार नाही आणि वजन देखील नियंत्रणात राहिल.
दालचिनी

-द जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार ब्रेड, धान्ये आणि इतर पदार्थांमध्ये चमचाभर दालचिनी घालून साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. तसेच, आपल्याला बराच काळ भूक लागत नाही.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Follow tips for weight loss)