मुंबई: आजकाल लांब केस ठेवण्याचा छंद खूप लोकांना आहे. छंद म्हणण्यापेक्षा सुद्धा लोकांना लांब केस खूप आवडतात. आजकाल केसांच्या अनेक समस्या आहेत त्यात एक मोठी समस्या म्हणजे केस गळती आणि केसांची वाढ न होणे. आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही एका महिन्यात केसांची वाढ दुप्पट करू शकता आणि यासाठी तुम्हाला खूप कमी खर्च असेल. आम्ही तुम्हाला कढीपत्त्याची एक अशी पद्धत सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी मिसळाव्या लागतील आणि त्या केसांना लावल्यानंतर केसांची लांबी वाढेल, तसेच केसगळती आणि तुटणे कमी होईल. चला तर मग जाणून घेऊया घरी तेल कसे तयार होईल.
हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला चार चमचे खोबरेल तेल, मूठभर कढीपत्ता आणि २० ग्रॅम मेथीदाणे लागतात. हे बनवण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घेण्याची गरज नाही, फक्त नारळाच्या तेलात या गोष्टी उकळून घ्या. मेथीदाणे आणि कढीपत्ता मऊ आणि विरघळेपर्यंत ते उकळत रहा.
आता गॅस बंद करून मेथीदाणे आणि कढीपत्ता चांगले मिसळावे लागतील. मग ते थंड करून काचेच्या बाटलीत फिल्टर करून साठवून ठेवा. आता आठवड्यातून दोन दिवस या तेलाची मालिश करून केसांचे आरोग्य सुधारू शकता.
यामुळे तुमच्या केसांची लांबी वाढेल आणि केसगळती आणि तुटणे देखील कमी होईल. हे तेल केसांना खराब होण्यापासून वाचवेल. त्यामुळे आजपासूनच या तेलाने डोक्याचा मसाज सुरू करा आणि पाहा तुमचे केस कसे काळे, दाट आणि लांब आहेत.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)