Ganeshotsav : मुंबई ते हैदराबाद, गणेशोत्सव काळात या ५ शहरांना नक्की भेट द्या

| Updated on: Sep 02, 2024 | 9:01 PM

Places to visit on Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाला काही दिवसात सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव काळात लोकं मोठ्या भक्तीभावाने गणेशाचू पूजा करतात. देशात अनेक ठिकाणी गणपतीची मंदिरे आहेत. जी प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव काळात तुम्ही देशातील काही शहरांना नक्की भेट देऊ शकतात जी तुम्हाला प्रसन्न करु शकता.

Ganeshotsav : मुंबई ते हैदराबाद, गणेशोत्सव काळात या ५ शहरांना नक्की भेट द्या
Follow us on

सनातन धर्मात श्री गणेशाला विशेष स्थान दिले आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाचे पूजन केले जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यावर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी देशभरात गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाणार असून घराघरात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. या काळात 10 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची भव्यता महाराष्ट्रापासून तेलंगणापर्यंत पाहायला मिळेल. भारतातील मुंबई, पुणे, गोवा, बंगळुरू आणि हैदराबाद सारख्या ठिकाणी गणेश चतुर्थीचा उत्सव खूप भव्य असतो. तुम्हीही या गणेश चतुर्थीला या ठिकाणांना नक्की भेट देऊ शकतो.

मुंबई

मुंबईतील गणेश उत्सव हे जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातून लोकं मुंबईला गणेशोत्सवसाठी येत असतात. मुंबईतील परळ परिसरात असलेले लालबागचा राजा, सिद्धिविनायक मंदिर आणि मुंबईचा राजा या गणेश गल्ली ते चिंचपोकळीचा चिंतामणी यासारखे गणेश मंडळे जगभरात प्रसिद्ध आहेत. मुंबईतील 10 दिवसांच्या गणेश उत्सवापासून ते विसर्जनापर्यंतचे उत्सव अतिशय भव्य आणि आकर्षक असतात. ज्यामध्ये लाखो लोक सहभागी होतात.

पुणे

गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण महाराष्ट्रातील पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येतात. गणेश चतुर्थीनिमित्त येथे बाप्पाची विशेष पूजा केली जाते. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील मंडपांची सर्जनशीलता, भव्यता आणि उत्साह पाहणाऱ्यांना थक्क करून सोडतो.

गोवा

गणेश चतुर्थी हा उत्सव केवळ मुंबई आणि पुण्यापुरताच मर्यादित नाहीये. हे 10 दिवस गोव्यातही उत्साह असतो. गणेश चतुर्थीचा उत्सव येथे पारंपारिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो. गोव्यात कोकणी शैलीत बनवलेल्या आणि सजवलेल्या गणेशाच्या मूर्ती पाहायला मिळतात. येथील समुद्रकिनाऱ्यांवर विसर्जनाचे दृश्य अतिशय मनमोहक दिसते.

बंगळुरू

गोवा आणि महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही गणेशोत्सव प्रसिद्ध उत्सव आहे. येथे मोठ्या उत्साहाने भाविक गणेशाची पूजा करतात. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बंगळुरूची मंदिरे आणि मंडप भव्यपणे सजवले जातात. बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक बंगळुरूला येतात. बंगळुरूच्या आयटी सिटीचा गणेश उत्सव सर्वात प्रसिद्ध आहे.

हैदराबाद

हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीचा सण हैद्राबादच्या खैराताबादमध्ये देखील असतो. गणेशाच्या भव्य मूर्ती येथे बसवात. जी लोकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.