स्वयंपाक घरातील या गोष्टीने करा दातांचा पिवळेपणा दूर, दात होतील मोत्यासारखे चमकदार

| Updated on: Feb 05, 2025 | 4:15 PM

पिवळे दात अनेकवेळा लाजिरवाणे बनतात. अशा परिस्थितीत लोकांचा आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. खरे तर दात पांढरे करण्यासाठी अनेक टूथपेस्ट आणि उपचार आहेत पण तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात असलेल्या एका गोष्टीने तुमचे पिवळे दात चमकदार करू शकता.

स्वयंपाक घरातील या गोष्टीने करा दातांचा पिवळेपणा दूर, दात होतील मोत्यासारखे चमकदार
Follow us on

पिवळे दात तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि विश्वासावर परिणाम करतात. जास्त चहा, कॉफी पिणे, नीट ब्रश न करणे, तंबाखू किंवा सिगारेटचे सेवन करणे तसेच दातांची योग्य काळजी न घेणे अशा अनेक कारणांमुळे दात पिवळे पडू शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या टूथपेस्ट आणि केमिकल ब्लिचिंग मुळे दात पांढरे होतात पण त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. दातांचा पिवळेपणा तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने काढायचा असेल तर तुम्ही याची सुरुवात तुमच्या स्वयंपाक घरातून करू शकता. तुमच्या स्वयंपाक घरात असलेली एक सामान्य गोष्ट तुमचे दात मोत्यासारखे पांढरे करू शकते. जाणून घेऊ खास घरगुती उपाय ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या दातांची चमक परत आणू शकता.

बेकिंग सोडा
बेकिंग सोडा जो आपण जेवण बनवताना वापरतो तो बेकिंग सोडा नैसर्गिक क्लीनर म्हणून काम करतो. हे एक सौम्य अपघशक आहे जे दातांवर साचलेली घाण आणि पिवळसरपणा काढून टाकण्यास मदत करते. बेकिंग सोडा वापरून तुम्ही तुमचे पिवळे दात पुन्हा चमकदार बनवू शकता.

कसा करायचा वापर

बेकिंग सोडा आणि टूथपेस्ट: तुमच्या रोजच्या टूथपेस्टमध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि ब्रश करा. काही दिवसात तुमच्या दातांचा पिवळेपणा निघून जाईल.

बेकिंग सोडा आणि लिंबू: अर्धा चमचा बेकिंग सोड्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा त्याची पेस्ट तयार करा आणि हलक्या हाताने ब्रश करा. हे तुम्ही काही दिवसांसाठीच करू शकतात.

बेकिंग सोडा आणि खोबरेल तेल: बेकिंग सोड्यामध्ये थोडे खोबरेल तेल मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि ते दातांवर लावा दोन ते तीन मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर हलक्या हाताने ब्रश करा.

बेकिंग सोडा वापरण्याचे फायदे
बेकिंग सोडा वापरल्याने दातांचा पिवळेपणा हळूहळू कमी होतो. दातांवरील घाण आणि डाग काढून टाकण्यास मदत मिळते. तसेच श्वासांची दुर्गंधी दूर होते आणि दात स्वच्छ होतात.

या गोष्टी लक्षात ठेवा
बेकिंग सोडा आठवड्यातून दोन ते तीन वेळापेक्षा जास्त वेळा वापरू नका. कारण जास्त वापरल्यामुळे दातांच्या वरच्या थराला नुकसान होऊ शकते. नेहमी हळुवारपणे ब्रश करा आणि जास्त घासणे टाळा. जर तुम्हाला हिरड्यांमध्ये जळजळ किंवा कोणत्याही प्रकारची अस्वस्थता जाणवत असेल तर बेकिंग सोडा वापरणे थांबवा.