मुंबई : तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तूपात व्हिटॅमिन ए, के, ई असते. तूप खाल्लांने आपले केस आणि त्वचा चांगली होते. केस बहुधा कोरडे आणि निर्जीव होतात. तुपामुळे डोक्यातील कोंडा, फुटलेले केस, पांढरे केस या समस्या दूर होऊ शकतात. जर आपले केस खराब झाले असतील तर आपण केसांना तूपाने मालिश करा. यामुळे तुमचे केस मुलायम आणि चमकदार बनतील. (Ghee beneficial for skin and hair)
1. जर आपल्या डोळ्याखाली डार्क सर्कल झाले असतील तर झोपण्याच्या अगोदर चेहरा पाण्याने धुवा. त्यानंतर डोळ्याखाली तूप लावा. काही दिवसातच फरक दिसून येईल.
2. वाढत्या वयानुसार, त्वचा सैल होते आणि सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्या दूर करण्यासाठी तुपाचे काही थेंब आपल्या हातावर घ्या आणि ते चेहरा आणि सुरकुत्या असलेल्या ठिकाणी लावा. सुमारे अर्धा तास तसेच ठेवा. यानंतर थंड पाण्याने तोंड धुवा.
3. जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर तुम्ही तुपात थोडे पाणी मिक्स करा आणि त्वचेवर लावा. साधारण 15 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे करा. यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल.
4. आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाचे डाग दूर करण्यासाठी एक चमचे कडुनिंब पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचे तूप याची पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनी चेहरा धुवा.
5. ब्लॅकहेड्सची समस्या असल्यास मुलतानी मातीमध्ये तूप मिसळा आणि पॅक बनवून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.
6. बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची वाढ होत नसेल तर तूपात आवळा आणि कांद्याचा रस मिसळा आणि मालिश करा.
7. तूप केसांना हायड्रेट करते. केसांमध्ये ओलावा कमी झाल्यामुळे केस निस्तेज व खराब होतात. अशा केसांसाठी तूप उत्तम उपाय आहे. त्यात आढळणारे हेल्दी फॅटी अॅसिड स्कल्पचे पोषण करून केसांच्या मुळांना हायड्रेट करतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Ghee beneficial for skin and hair)