मुंबई : शतावरी ही एक औषधी वनस्पती आहे. त्याची पाने आणि मुळे औषध म्हणून वापरली जातात. शतावरी ही औषधी वनस्पती बऱ्याच औषधांमध्ये वापरली जाते. शतावरी ही वनस्पती आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाची आहे. विशेष म्हणजे शतावरीचा आहारात समावेश केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होते. शतावरीमुळे अनेक रोगांचा समस्या दूर होण्यास मदत होते. (Ginseng is beneficial for boosting the immune system)
तणाव कमी करण्यासाठी – शतावरीमध्ये तणाव कमी करण्याचे गुणधर्म आहेत. हे स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल करते आणि ग्रंथीला मजबूत करते. यामुळे मानसिक आणि शारीरिक ताणतणाव दूर होण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते – शतावरी वनस्पती व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका कमी करते. यामुळे सध्याच्या काळात शतावरीचा चहा घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
उच्च रक्तदाब – उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आपण शतावरीचा चहा घेऊ शकतो. उच्च रक्तदाब ग्रस्त लोकांसाठी हे फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी शतावरीचा चहा हा एक नैसर्गिक घरगुती उपाय आहे.
मधुमेहापासून बचाव – शतावरी आपण रिकाम्या पोटी खाऊ शकतो. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. हे मधुमेह रोखू शकते.
वजन कमी करण्यासाठी – शतावरीमध्ये भूक कमी करण्यासाठी गुणधर्म आहे. तसेच यात कॅलरी प्रमाण खूप कमी असते. आपण शतावरीचा चहा घेऊ शकतो. याशिवाय बारीक करून आपण शतावरीचे पावडर घेऊ शकतो.
त्वचेसाठी फायदेशीर – शतावरीची पाने आणि मुळांमध्ये व्हिटॅमिन, खनिज आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. ते आपली त्वचा निरोगी ठेवतात. यामुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. ते आपली त्वचा हायड्रेटेड आणि त्वचेचा टोन ठेवण्याचे कार्य करते.
केसांसाठी फायदेशीर – शतावरीमध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट असतात. हे केस गळती रोखण्यास मदत करतात. तसेच ज्यांना टक्कल आहे त्यांनी शतावरीचा चहाचा आहारात समावेश केला पाहिजे.
(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Ginseng is beneficial for boosting the immune system)