ग्नाचा सीझन आता सुरू झाला आहे. यामध्ये स्त्रियांना सर्वात प्रथम चिंता असते ती म्हणजे लग्नामध्ये वेगवेगळ्या फंक्शनसाठी इतके कपडे कुठून आणायचे. महिलांना बऱ्याचवेळा हेच समजत नाही की प्रत्येक वेळी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पर्यायामधून त्या वेगळ्या दिसू शकतात. जाणून घेऊया अशाच काही सोप्या टिप्स ज्यामुळे तुम्ही तुमच्याकडे असलेले कपडे वापरून स्वतःला युनिक लूक देऊ शकता. हे काम तुम्हाला वाटत असेल की खूप अवघड आहे मात्र तसे अजिबात नाही. तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की प्रत्येक वेळी नवीन कपडे घ्यायचे नसतील तर तुम्ही तुमचे जुने कपडे मिक्स आणि मॅच करून ते घालू शकता. सोबतच तुम्ही तुमच्याकडे जुना स्कर्ट, साडी किंवा घागरा असेल तर त्यापासून तुम्ही स्वतःसाठी एक अनोखा ड्रेस देखील बनवू शकता. बऱ्याच स्त्रिया त्यांच्या जुन्या साड्यांचे ड्रेस शिवतात.
जुन्या साडीला तुम्ही नवा लुक देऊ शकता. तुम्ही तुमच्या जुन्या साडीचा सुंदर असा ड्रेस बनवू शकता. अनेक स्त्रिया त्यांच्या जुन्या साडीचा वापर करून जंप सूट किंवा शरारा ड्रेस बनवतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यापैकी कोणताही ड्रेस तयार करू शकता त्यासोबतच जुनी साडी वापरून तुम्ही घागरा ही तयार करू शकता.
तुमच्याकडे असणाऱ्या जुन्या स्कर्ट साठी त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज खरेदी करू शकता. रेडिमेड ब्लाऊज बाजारात सहज उपलब्ध होतात किंवा ब्लाउज साठी कोणतेही कापड घेऊन तुम्ही तुमच्या टेलर कडून ब्लाउज देखील शिवून घेवू शकता. स्कर्ट वर घालण्यासाठी क्रॉप टॉप देखील छान दिसतात. जर तुमचा स्कर्ट प्लेन असेल तर तुम्ही त्यावर प्रिंटेड ब्लाऊज वापरू शकता आणि जर स्कर्ट प्रिंटेड असेल तर प्लेन ब्लाउज तुम्ही स्कर्ट वर घालू शकता. हे घातल्यानंतर तुम्ही तुमचे आवडते दागिने घालू शकता. ड्रेस नुसार हेअर स्टाईल करून एक युनिक लूक तयार करू शकता.
जर तुमच्याकडे जुना घागरा असेल किंवा तुमच्या लग्नाचा असेल तर तुम्ही त्यातून एक नवीन ड्रेस बनवू शकता. तुम्ही घागऱ्यासाठी नवीन ब्लाउज आणि नवीन ओढणी विकत घेऊ शकता आणि त्याला साडी प्रमाणे नेसू शकता. याशिवाय तुम्ही घागऱ्याचा ब्लाउज इतर कोणत्याही साडी सोबत घालू शकता. इतकेच नाही तर तुम्ही घागऱ्याची ओढणी कोणत्याही ड्रेस सोबत सहज वापरू शकता यामुळे तुमचा ड्रेस आणखीन उठून दिसेल.