सनातन धर्मात श्रीमद्भगवद्गीतेचे मोठे महत्त्व आहे. श्रीमद्भगवद्गीतेमधील क्ष्लोक किती पवित्र आणि अर्तपूर्ण आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे. श्रीमद्भगवद्गीतेत एकूण 18 अध्याय आणि 700 श्लोक आहे. दरम्यान गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नक्कीच आयुष्याचं सार समजतं.
गीतेमध्ये मनुष्याच्या उद्धाराचे मार्ग
श्रीमद्भगवद्गीतेच्या वाचनाने व्यक्ती चांगला आणि यशस्वी माणूस बनतो. गीतेमध्ये मनुष्याच्या उद्धाराचे मार्ग स्पष्ट केले आहेत. गीता उपदेश भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनला दिला होता. अवघ्या 45 मिनिटांत त्यांनी आयुष्याचे रहस्य सांगितले.
दरम्यान कुरुक्षेत्राच्या मैदानात झालेली लढाई अर्जुनसाठी मात्र झेपवणारी नव्हती कारण आपल्याच माणसांना मारणं हे त्याच्या मनाला पटणारे नव्हते. कारण हा लढा धर्म आणि अधर्म यांच्यात होता. त्यामुळे ते होणार हे निश्चित होते. अशा स्थितीत अर्जुनाची द्विधा मनःस्थिती संपवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप प्रकट करून अर्जुनाला जीवनाचे रहस्य सांगितले.
या गोष्टींचा करा त्याग
पण याच गीतेमधील अशा दोन गोष्टींबद्दल सांगणार आहोत जर एखाद्या व्यक्तीने त्या दोन गोष्टींचा त्याग केला तर त्या व्यक्तीला यश हे मिळणारचं.पाहुयात भगवान कृष्ण यांनी म्हटल्याप्रमाणे त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या.
आसक्ती म्हणजे “मला हे माझ्या हातून निसटू द्यायचं नाहीये मग त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी”, जसं की आपल्याकडे आधीपासूनच असलेल्या गोष्टीबद्दल तिला न गमावण्यासाठी केलेली धडपड म्हणजे आसक्ती आणि स्वार्थ भावना म्हणजे आपल्या सर्वांनाच माहित आहे आपल्या आनंदासाठी समोरच्याचे नुकसान म्हणजे स्वार्थ. ज्यात स्वत:चा सोडून कोणाचाच विचार केला जात नाही .
स्वार्थ आणि आसक्ती
गीतेच्या प्रवचनात भगवान श्रीकृष्ण यांनी म्हटलं आहे माणसाला त्याचा स्वार्थ आणि आसक्ती सोडावी लागेल. कारण या दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात कधीही पुढे जाऊ देऊ शकत नाहीत. या दोन गोष्टींचा त्याग केल्यास मनुष्य त्याच्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. याबद्दल अजून जाणून घेऊयात.
1) गीतेत भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं आहे,की एक दिवस माणूस त्याच्या वेळेबद्दल नाही तर स्वतःविरुद्ध तक्रार करू लागतो. कारण त्याला आपले सुंदर जीवन सोडून सांसारिक व्यवहारात अडकावे लागते. म्हणून नेहमी सत्मार्गाचा अवलंब करावा.
2) भगवान श्रीकृष्णाच्या मते, जर देवाने तुम्हाला नवीन सुरुवात करण्यासाठी संधी दिली तर तुम्ही कधीही ती संधी चुकवू नका. आणि त्या नवीन संधीत पहिल्या केलेल्या चुकाही पुन्हा न करण्याचा प्रयत्न करा . कारण यामुळे नवीन संधीची अवस्थाही पहिल्या चुकांच्या प्रभावाने वाया जाऊ शकते.
3) गीता उपदेशादरम्यान भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते की, माणसाची खरी ओळख म्हणजे त्याचे बोलणे आणि वागणे. स्थिती आणि पदाची जी काही ताकद आहे,ती आज आहे तर, उद्या नसेल. म्हणून, नेहमी कोणाच्याही समोर आपल्या वागण्याबाबत सतर्क राहा आणि शब्दांचा काळजीपूर्वक विचार करूनच वापर करा.
या गोष्टींमुळे नक्कीच माणसाकडून पुन्हा त्याच चुका न घडता त्याला त्याच्या आयुष्यात पुढे जाण्याच्या संधी मिळतच जातील. दरम्यान गीता संस्कृत भाषेत लिहिली गेली होती, मात्र आज ती हिंदी, इंग्रजीसह इतर अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. त्यामुळे सर्वजन गीता वाचून आपले आयुष्य बदलू शकतात.