चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या घालवण्यासाठी दररोज खा द्राक्ष !

| Updated on: Apr 05, 2021 | 8:05 AM

आज बरेच लोक चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्यांमुळे त्रस्त आहेत. वेगवेगळे उपचार घेऊन देखील त्यांची ही समस्या दूर होताना दिसत नाही.

चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या घालवण्यासाठी दररोज खा द्राक्ष !
द्राक्ष
Follow us on

मुंबई : आज बरेच लोक चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्यांमुळे त्रस्त आहेत. वेगवेगळे उपचार घेऊन देखील त्यांची ही समस्या दूर होताना दिसत नाही. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या घालवण्यासाठी द्राक्ष हे अत्यंत फायदेशीर आहेत. कारण द्राक्ष खाल्ल्याने शरीरात ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते. द्राक्षामध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. (Grapes are beneficial for removing blemishes and wrinkles on the face)

-द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम सारख्या अनेक घटक असतात. द्राक्षे अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये फायदेशीर आहे. त्यामुळे ज्या लोकांना हे रोग आहेत त्यांनी जास्तीत-जास्त प्रमाणात द्राक्ष खाल्ले पाहिजेत.

-शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात आयर्न असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात 2 चमचे मध घालून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.

-जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर द्राक्षे त्यांच्यासाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. द्राक्षे खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाब असेल तर आठवड्यातून तीन ते चार दिवस द्राक्षे खा, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

-आपल्यालाही मायग्रेनची समस्या असल्यास, आपण त्वरित द्राक्षे खाण्यास सुरवात केली पाहिजे. द्राक्षाचा रस पिणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. काही दिवस तुम्ही द्राक्षाचा रस घेतल्यास तुम्हाला मायग्रेनच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळू शकेल.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!

(Grapes are beneficial for removing blemishes and wrinkles on the face)