मुंबई : जवळपास सर्वचजण वजन कमी करण्यासाठी दिवसातून अनेक वेळा ग्रीन टी घेतात. मात्र, आपल्याला हे माहिती आहे का? की, ग्रीन टी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. ग्रीन टीमध्ये अॅंटी-ऑक्सीडंट आणि पॉलीफेनॉल घटक असतात. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच ग्रीन टी ही तुमच्या त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. (Green tea is beneficial for boosting the immune system)
ग्रीन टी मधील घटक शरीरातील मेटाबॉलिज्म घटकाला वाढवतात. त्यामुळे शरीरातील वजन कमी होते. पण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सोबतच नियमित व्यायामही गरजेचा असतो. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायामासोबतच, फळ, पालेभाज्या यांचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच यासोबतच ग्रीन टी चे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
-लिंबाचा रस ग्रीन टीच्या कडू चवीचा प्रतिकार करतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लिंबूवर्गीय फळामचा रस ग्रीनटीमध्ये मिसळल्यास त्यातील अँटीऑक्सिडेंट्स वाढतात, जे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत.
-ग्रीन टी सोबतच नियमित व्यायामही गरजेचा असतो. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायामासोबतच, फळ, पालेभाज्या यांचे सेवन करणे गरजेचे आहे.
-ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याला खूप जास्त गरम करु नका. त्यामुळे त्यात आवश्यक जीवनसत्त्व नष्ट होतात. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही पाणी गरम करुन 10 मिनीटे तसेच ठेवा.
-ग्रीन टीचे पॅकेट कपात घेऊन त्यावर गरम पाणी टाका आणि 1 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर प्या.
-दिवसातून 1 ते 3 कपापेक्षा जास्त ग्रीन टी सेवन करू नये. असे केल्याने शरीराला इजा होऊ शकते आणि ती व्यक्ती शारीरिक दुर्बलतेचा बळी पडू शकते. तसेच ग्रीन टीचे सेवन करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर किमान एक तासाच्या अंतरानेच काहीही पदार्थ खावेत.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Green tea is beneficial for boosting the immune system)