Black Tea की Green Tea? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा ठरतो फायदेशीर

| Updated on: Jan 01, 2024 | 7:40 PM

Weight loss Tea : वजन कमी करण्यासाठी लोकं वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करतात. जे लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक असतात ते ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पिणे पसंत करतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी आणि ब्लॅक टी यापैकी कोणता चहा चांगला आहे हे जाणून घ्या.

Black Tea की Green Tea? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा ठरतो फायदेशीर
Follow us on

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक गोष्टी करतात. कोणी डाएट फॉलो करतात तर कोणी खाणंच कमी करतात. कोणी खूप व्यायाम करतात तर कोणी वेगवेगळी औषधे वापरतात. काही लोक सकाळी वेगवेगळी पेये घेतात. ज्यामुळे वजन नियंत्रित करता येते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील वेगवेगळ्या गोष्टी करत असाल त्यापैकी एक गोष्ट म्हणजे चहा. वजन कमी करण्यासाठी कोणता चहा घेतला पाहिजे. ग्रीन टी की ब्लॅक टी. याबाबत आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन हे वनस्पती संयुगे असतात. जे आपले चयापचय वाढवता. ज्यामुळे आपले वजन कमी होते. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट देखील असतात जे चरबी कमी करतात. ब्लॅक टी फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्स या अँटिऑक्सिडंट्स समृद्ध आहेत. हे वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी अधिक प्रभावी मानला जातो. तुम्ही जर ग्रीन टी घेत असाल तर याचे चांगले परिणाम मिळतील.

ग्रीन टी आणि ब्लॅक टी काय प्यावे?

ग्रीन टीमध्ये ईजीसीजी नावाचे अँटिऑक्सिडेंट असतात. जे फॅट बर्न करण्यास मदत करतात. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे वनस्पती संयुग भरपूर प्रमाणात असते जे चयापचय गती वाढवते आणि अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. याशिवाय ग्रीन टी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे आपण कमी खातो. ब्लॅक टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि चरबी बर्न करणारे संयुगे नसतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी अधिक फायदेशीर आहे. ब्लॅक टीपेक्षा ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर आहे.