Hair Care Tips : तेल लावल्यानंतर तुमचेही केस गळतात?, मग या चुका टाळा

| Updated on: Feb 04, 2022 | 10:30 PM

केसांमध्ये कोरडेपणा (Dryness in the hair) येणे ही आजकाल एक सामान्य बाब झाली आहे. अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. केसांमध्ये कोरडेपणा निर्माण झाल्याने केस गळणे, डोक्यात कोंडा (Dandruff) होणे अशा अनेक समस्या (Hair problems) निर्माण होतात.

Hair Care Tips : तेल लावल्यानंतर तुमचेही केस गळतात?, मग या चुका टाळा
केस गळण्याची समस्या
Follow us on

Hair Care Tips : केसांमध्ये कोरडेपणा (Dryness in the hair) येणे ही आजकाल एक सामान्य बाब झाली आहे. अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. केसांमध्ये कोरडेपणा निर्माण झाल्याने केस गळणे, डोक्यात कोंडा (Dandruff) होणे अशा अनेक समस्या (Hair problems) निर्माण होतात. केसाच्या समस्यांपासून बचावासाठी केसांची योग्य निगा राखण्याचा सल्ला दिला जातो. यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे रोज सकाळी किंवा संध्याकाळी तेलाने केसांची मॉलीश करणे हा आहे. केसांना तेल लावल्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात. तसेच केसांमध्ये चमक निर्माण होते. मात्र अनेक जण तेल लावताना काही चूका करतात. त्याचा परिणाम म्हणजे तुमचे केस गळण्यास सुरुवात होते. या चुका नेमक्या कोणत्या आहेत? त्या आपल्याला कशा टाळता येतील हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

गरम तेल

अनेकदा लोक केसांना गरम तेल लावण्याची चूक करतात. सतत गरम तेल लावल्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. मुळे कमकुवत झाल्याने केस गळण्यास सुरुवात होते. तसेच टाळूची जळजळ देखील होते. तज्ज्ञांच्या मते केसांना गरम तेल न लावता कोमट तेल लावावे.

मॉलिश करताना चूक

अनेक जण मॉलिश करताना केसांवर आवश्यकतेपेक्षा अधिक जोर देतात. असे केल्याने केसांची मुळे कमकुवत होतात. मुळे कमकुवत झाल्याने केस गळू लागतात. तसेच मॉलिश करताना अधिक जोर लावल्यास त्याचा तुमच्या टाळूला देखील त्रास होतो. त्यामुळे मॉलिश करताना कधिही हालक्या हाताने मॉलिश करावी.

केस बांधणे

केसांना तेल लावल्यानंतर अनेक जण केस घट्ट बांधण्याची चुक करतात. यामुळे केसांवर अतिरिक्त ताण पडतो. तेल लावल्यानंतर लगेचच केस बांधल्यास केसांच्या मुळांवर अधिक ताण पडतो. परिणामी केस गळायला सुरुवात होते.

केसांमध्ये तेल बराच वेळ ठेवणे

अनेक जण केसांना तेल लावल्यानंतर ते बराचवेळ ठेवतात. तसे केल्याने अनेकदा केसांमध्ये माती आणि धुळीचे कण साठतात. केसात धुळ गेल्याने केस कोरडे होतात. कोरड्या केसांमुळे केस गळणे, कोंडा होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे तेल लावल्यानंतर काहीवेळानंतर केस धुण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

संबंधित बातम्या

आपल्या चेहऱ्यावरील फक्त नाकाला कव्हर करतो हा आगळावेगळा मास्क, फायदे जाणून घ्याल तर आजच खरेदी कराल !!

अनेक आजारपणात रामबाण औषध ठरते काळे मिठ! वाचा काळ्या मिठाचे थक्क करणारे फायदे

Health Care Tips : गरोदरपणात टोफूचा आहारात समावेश करा, जाणून घ्या त्याचे फायदे!