काळानुसार लोक अनेक बदल स्वीकारत असतात. मग जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या या प्रथा परंपरांमध्येही बदल होतो. लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यातही काळानुसार अनेक बदल झाले आहेत. अनेक गोष्टी सोडून देण्यात आल्या आणि चांगल्या गोष्टी स्वीकारण्यात आल्या आहेत. पण काही गोष्टींना आजही तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. ती गोष्ट म्हणजे लग्नात हळद लावणे, हातावर मेहंदी काढ या गोष्टी आजही परंपरा म्हणून पाळल्या जातात. हळदीचा कार्यक्रम तर सर्वांचा फेव्हरेट विषय असतो. लग्नापेक्षाही हा मोठा सोहळा असतो.
हळदीच्या कार्यक्रमाचा विचार केल्यास लग्नाच्या एक किंवा दोन दिवस आधी नवरदेव आणि नवरी आपल्या घरी हळदीचा कार्यक्रम ठेवतात. हळदीच्या कार्यक्रमाचाही आता ट्रेंड वाढत आहे. या दिवशी नॉनव्हेज जेवणाचा बेत असतो. कुटुंबातील सर्वच जण हळद लावण्याच्या कार्यक्रमात भाग घेत असतात. जोडप्यांसाठी तर हा सुखद क्षण असतो. त्यामुळे कधी कधी हळदीच्या कार्यक्रमाला फॅन्सी टच दिला जातो. त्यामुळे हळद लावणे राहिले मागे आणि भलतेच सुरू होते. पण अंगाला हळद लावणं किती फायदेशीर आहे हे माहीत आहे का? हळद लावण्याचे असंख्य फायदे आहेत. त्याची जशी धार्मिक कारणे आहेत, तसेच वैज्ञानिक कारणंही आहेत.
हळदीतील महत्त्वाचे घटक त्वचेचा काळपटपणा घालवतो. याच कारणामुळे, पिढ्यानपिढ्या प्रत्येक घरात हळदीचा त्वचेच्या नैसर्गिक उपचाराच्या रूपात वापर केला जाते. नवरीला लावली जाणारी हळद गुलाबजल आणि चंदनासोबत मिसळवण्यात येते. हे दोन्ही घटक त्वचेवरील पिग्मेंटेशन आणि डार्क स्पॉट्स कमी करण्यास मदत करतात.
हळद लावल्यानंतर, जेव्हा ती त्वचेतून रगडून काढली जाते, तेव्हा ह्या प्रक्रियेत डेड स्किन निघून जाते. यामुळे त्वचेवरील माती खोलवरून साफ होते. यामुळे त्वचा सौम्य आणि मुलायम होऊन जाते. तसेच हळद लावल्यामुळे त्वचा उजळून निघते.
हळदीत असलेल्या प्रॉपर्टीज आणि लेप काढताना होणारी स्क्रबिंग, या दोन्ही गोष्टी मिळून त्वचेला नैतिक चमक देतात. एक खास गोष्ट म्हणजे हळदीच्या कार्यक्रमात नवरा-नवरीला संपूर्ण शरीरावर हळद लावली जाते. यामुळे केवळ चेहरा नाही, तर जोडप्याचे संपूर्ण शरीर सौम्य आणि चमकदार बनते.
हळदीत अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. याच कारणामुळे, हळद लावल्यावर चेहरा आणि शरीरावरचे पिंपल्स आणि अॅक्ने कमी होतात. त्याचा फायदा वेडिंग डे च्या दिवशी दिसतो, जेव्हा त्वचा मऊ आणि निरोगी दिसते, आणि नवरी दहापट सुंदर दिसते.