मुंबई : पपई हे जवळपास सर्वांचे आवडतीचे फळ आहे. पपई आरोग्यासाठी खूप चांगली आहे, पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात. बरेच लोक आपल्या आहारात नियमितपणे पपईचा समावेश करतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, फक्त पपईच नाही तर त्याच्या बिया देखील शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. पपईच्या बियामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबरसह अनेक महत्त्वपूर्ण घटक असतात. चला तर मग पपईच्या बियांचे काय-काय फायदे होतात जाणून घेऊयात (Health benefits of papaya seeds)
-वजन नियंत्रणात आणण्यासाठी पपईच्या सुकवलेल्या बियांचंही सेवन करा. शरीराचे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने वजन कमी होते. तसंच वारंवार भूक लागण्याचीही समस्या उद्भवत नाही. याव्यतिरिक्त चयापचयाची क्षमता देखील सुधारते.
-हृदयाशी संबंधित अनेक विकारांवर पपईच्या बिया रामबाण उपाय आहेत. यातील औषधी गुणधर्म आपल्या हृदयाचे संरक्षण करतात. या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्सचा समावेश आहे, जे आपल्या शरीराचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करतात.
-पपईच्या बियांच्या सेवनामुळे शरीरावर आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते. या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल यासारखे महत्त्वपूर्ण कम्पाउंड असतात. यातील अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे संधिवात यासारख्या समस्यांमुळे शरीरावर येणारी सूज कमी होण्यास मदत मिळते.
-त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी पपईच्या बिया अतिशय चांगल्या आहेत. यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे घटक आपल्या त्वचेसाठी लाभदायक असतात. या बियांचे सेवन केल्यास कमी वयातच त्वचेवर दिसणारी वृद्धत्वाची लक्षणे उदाहरणार्थ सुरकुत्या इत्यादी समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
-पपईच्या बिया खाण्यापूर्वी त्या कशा खाव्यात आणि त्यांचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे, हे माहित असणे आवश्यक आहे. पपईच्या बियांचे सेवन करण्यापूर्वी आपण आपल्या आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांशी बोलले पाहिजे. ते सांगतील त्याप्रमाणेच पुढील कृती करावी. तथापि, पपईच्या बिया सामान्यत: वाटून, किंवा रस करून सेवन करतात येतात. पपईच्या बिया थेट चावून खाणे टाळावे. याशिवाय तुम्ही पपईच्या बियांसोबत मध किंवा गुळ देखील खाऊ शकता.
संबंधित बातम्या :
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Health benefits of papaya seeds)