मुंबई : पाय हा आपला शरीराचा अविभाज्य भाग आहे. आपल्या शरीराचं वजन पायांवर येतं. त्यामुळे वाढलेल्या वजनाचा त्रास पायांना होतो. महिला आणि पुरुष यांच्या पाय दुखण्यामागे वेगवेगळी कारणं असतात. तर वेगवेगळ्या वयोगटातही पाय दुखीची समस्या असू शकते. लहान मुलांपासून आजकाल तरुणांमध्येही पाय दुखण्याची समस्या आढळून येत आहेत. अगदी आपली खाण्या पिण्याच्या सवयीमुळेही पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो. या समस्यांमध्ये कारणं वेगळी असतात. सतत पाय दुखणे हे आरोग्यासाठी चांगलं नाही. पाय का दुखतात, पाय दुखल्यास काय करावे आणि या समस्येवर घरगुती उपाय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पाय दुखण्यामागे कारणं
1. योग्य प्रकारे बूट किंवा चप्पल न वापल्यामुळे पाय दुखण्याची समस्या तुम्हाला होऊ शकते.
2. कामाच्या ठिकाणी पुरुषांना शूज घालावे लागतात. 8-10 तास हे शूज पायात असल्याने तुम्हाला पाय दुखी आणि टाच दुखीची समस्या जाणू शकते.
3. रात्री अपुरी झोप
4. वाढलेलं वजन
5. जास्त चालणे, व्यायाम करणे
6. पाणी कमी पिणं
7. पायांमध्ये योग्यरीतीने रक्तप्रवाह न होणं
8. एकाच ठिकाणी जास्त उभे किंवा बसून राहणे
9. आहारात कॅल्शिअम आणि पॉटेशिअमसारख्या व्हिटॅमीन्सची कमतरता
10. महिलांना मासिक पाळीच्या वेळी पाय दुखण्याची समस्या जाणवते.
11. महिला खास करुन हाय हिलच्या चप्पला वापरतात यामुळेही त्यांना पाय दुखण्याची समस्या होते.
12. सतत जिन्यावरून चढ उतार केल्यामुळेही पायाची समस्या होते.
13. कॅलशियम आणि ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावाने पाय दुखतात.
पाय दुखणे टाळण्यासाठी काय केले पाहिजे
1. सर्वप्रथम वापरत असलेले शूज किंवा चप्पला बदला. आणि पायाला योग्य आणि आरामदायी असे शूज, चपल घ्यावे.
2. वजन कमी करण्यावर भर द्या.
3. आहारात योग्य तो बदल करा, कॅलशियम आणि ड जीवनसत्व असलेले पदार्थांचा समावेश करा.
काही घरगुती उपाय
हॉट अँड कोल्ड थेरपी (Hot And Cold Water Therapy)
ही थेरपी पाय दुखण्यावर चांगला आराम देते. या थेरपीसाठी दोन बादल्यामध्ये थंड आणि गरम पाणी घ्या. मग तुमचे पाय आधी गरम पाण्यात 3 मिनिटं ठेवा, त्यानंतर पाय बादलीतून बाहेर काढावे आणि 3 मिनिटं थांबावे आणि नंतर पाय थंड पाण्याच्या बादलीत 10 सेकंद ठेवावे. ही प्रक्रिया 2 ते 3 वेळा करावी. एक गोष्ट लक्षात घ्या या थेरपीची सुरुवात गरम पाण्याने करावी आणि शेवट थंड पाण्याने करावी. या थेरपीने शरीरात ब्लड फ्लोला चांगल्या प्रकारे होतं आणि पायांना आराम मिळतो.
सैंधव मीठ (Natural Salt)
सैंधव मीठ असलेल्या गरम पाण्यात पाय शेकावे.
लवंग तेल ( Clove Oil)
दुखण्यावर लवंग तेल हे उत्तम औषधं आहे. लवंग तेलाची मालीशमुळे पायाला आराम मिळतो.
हळद (Turmeric)
हळद ही सर्व दुखण्यावर रामबाण उपाय आहे. हळदीमधील करक्यूमिन घटक फार फायदेशीर असतं. त्यामुळे पाय दुखत असेल तर त्याला हळदीचा लेप लाव किंवा हळदीचं दूध तुम्ही रोज घेऊ शकता.
मसाज (Massages)
पाय दुखीवर मसाज करणं उत्तम उपाय असून तुम्ही मसाज करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करा.
वर्कआऊट फॉर फीट (Workout For Feet)
योग्य वर्कआऊट तुम्हाला कायम निरोगी ठेवणार. त्यामुळे तुम्ही नियमीत व्यायाम करा.
स्ट्रेचिंग (Stretching)
दिवसभराच्या धावपळीनंतर पायाला स्ट्रेचिंग केल्यास तुम्हाला याचा चांगला उपयोग होईल.