मुंबई : पोस्ट कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना न्यूमोनियाचा सामना करावा लागला आहे. अनेक ठिकाणी तर कोविडमधून बरे झालेले रुग्ण नंतर न्यूमोनियाचे बळी ठरल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. न्यूमोनिया साधारणत: लहान मुले व वयोवृध्दांसाठी मोठ्या प्रमाणात घातक ठरु शकतो. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनादेखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची (corona) लागण झाली होती. त्यातून बाहेर आल्या परंतु नंतर त्यांना लगेच न्यूमोनियाने (Pneumonia) ग्रासल्याने अखेर रविवारी त्यांचे निधन झाले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहान मुले आणि वृद्ध दोघेही न्यूमोनियाचे सहज बळी पडतात आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये हा आजार खूप गंभीर बनतो. वृद्धत्वामुळे आणि प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे, ते वृद्धांच्या फुफ्फुसावर हल्ला करते. कोविडनंतर जर न्यूमोनिया झाला असेल तर याकडे दुर्लक्ष व्हायला नको, कोरोना काळात आधीच कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती न्यूमोनियामुळे अजूच कमी होत असते. त्यामुळे खासकरुन वृध्दांनी याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोना काळात अनेक जण कोरोनातून बाहेर आल्यावर त्यांना म्युकरमायकोसिस, न्यूमोनिया अशा पोस्ट कोविडच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. कोरोनातून बाहेर पडल्यावर रोगप्रतिकाशक्ती कमी झालेली असते. त्यातच न्यूमोनियाची लागण झाल्यामुळे खासकरुन वृध्दांसाठी हे अधिक घातक स्वरुपाचे ठरत असते. इंडियन चेस्ट सोसायटीचे सदस्य डॉ. ए.के. सिंग यांच्या मते, न्यूमोनिया पोस्ट कोविडनंतरचा खातक प्रकार आहे. कोरोनानंतर निमोनिया झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कोरोनापासून देशात बुरशीजन्य न्यूमोनियाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. या न्यूमोनियामध्ये फुफ्फुसात संसर्ग होतो जो एक्स-रेमध्ये स्पष्टपणे दिसतो. गेल्या काही दिवसांपासून अनेक मृत्यूंच्या घटनांमध्ये गंभीर न्यूमोनियानेही जीव घेतल्याचे दिसून येत आहे. त्याच वेळी, न्यूमोनिया, सेप्सिस (Sepsis) एक रोग आहे. जर एखाद्या रुग्णाला सेप्सिस असेल तर ते न्यूमोनियाला अधिक धोकादायक बनवते.
डॉ. सिंग सांगतात, न्यूमोनियामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 5 ते 10 टक्के लोकांचा मृत्यू होऊ शकतो. गंभीर रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवावे लागते, अशावेळी मृत्यूचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत जाते. या रोगासाठी रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती विशेषतः जबाबदार असते. म्हणूनच वृद्धांमध्ये न्यूमोनिया धोकादायक आहे. वृद्धांच्या शरीराची प्रतिकारशक्ती फारशी चांगली नसते. अनेक वेळा जंतुसंसर्ग झाला की आपल्याला औषधे दिली जातात, ते रोगाशी लढतात, परंतु रोगाशी लढण्यासाठी आपली स्वतःची प्रतिकारशक्तीदेखील खूप महत्त्वाची असते. औषधांमुळे रोगाशी लढण्यास मदत होत असते. परंतु याला शरीराचीही सोबत असणे आवश्यक असते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली असल्यास शरीरापासून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आपल्या शरीरावर संबंधित आजार अधिक हावी होत असतो. त्यातून मृत्यूचाही धोको संभवतो.
कोरोनानंतर, अनेक संधीसाधू जिवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, ज्याला सामान्यतः न्यूमोनिया म्हणतात. म्हणजेच न्यूमोनिया हा कोरोनाचाच पुढील गंभीर प्रकार म्हणून समोर येत आहे. यामध्ये फुफ्फुसांना खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत, बरे होण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधीही लागू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला खोकल्याबरोबर पिवळ्या रंगाचा कफ येत असेल. यासोबतच खूप ताप येत असते तसेच दीर्घ श्वास घेताना अडचणी येत असल्यास न्यूमोनियाची शक्यता नाकारता येत नाही. यात, रुग्णाला छातीच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला वेदना होऊ शकतात. कधी-कधी जास्त ताप नाही पण इतर दोन लक्षणे असतील तर न्यूमोनिया होऊ शकतो. या आजारात फुफ्फुसांना सर्वाधिक त्रास होतो.
संबंधित बातम्या :
Lata Mangeshkar Nidhan | दीदी गेल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा