मुंबई : अनेक कंपन्यांनी कोरोनाच्या (COVID-19) काळात त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने घरूनच काम (Work from home) करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरून काम करण्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत. नुकसानाबद्दल बोलायचे झाल्यास याचा परिणाम लोकांच्या जीवनशैलीवर होताना दिसत आहे. शारीरिक हालचाली कमी झाल्याने अनेक आजारांनी ग्रासले आहे. या आजारांमध्ये थायरॉईड, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही समावेश आहे. या आजारांव्यतिरिक्त, एक अतिशय सामान्य आजार आहे जो या कारणामुळे बहुतेक लोकांना आपल्या कवेत घेतो, तो म्हणजे लठ्ठपणा. घरातून काम करताना लोक अनेक लहानसहान चुका होतात, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. वजन वाढल्यानंतर लोकांना गुडघेदुखीचाही सामना करावा लागतो. आपण आता अशाच काही चुकांबाबत चर्चा करणार आहोत, ज्या ऑनलाइन काम करताना होतात.
तज्ज्ञांच्या मते, दिवसातून 7 ते 8 तासांची झोप घेणे शरीरासाठी योग्य आहे. परंतु अनेक वेळा लोक 9 ते 10 तास किंवा त्याहून अधिक झोपतात. ऑनलाइन काम करताना अनेक वेळा आपली शारीरिक यंत्रणा बिघडलेली असते. परंतु आशा वेळीही जास्त झोप घेणे आपल्या शरीराला धोक्याचे असू शकते.
पाणी हे सर्व प्रकारच्या आजारांपासून लांब राहण्यासाठी गुणकारी मानले जाते. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, घरातून काम करताना लोक कामात इतके व्यस्त असतात की त्यांना पाणी पिण्याचे देखील भान राहत नाही. अशा वेळी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने परिणामी वजन वाढते.
घरून काम केल्यामुळे शारीरिक हालचाली मंदावतात तसेच त्याचा आपल्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो. कामाच्या दबावामुळे लोक तासन् तास लॅपटॉप किंवा पीसीसमोर बसून असतात. तज्ज्ञांच्या मते, काम करीत असताना छोटीशी उसंत घेणे गरजेचे असते, त्यामुळे शारीरिक क्रियाशिलताही वाढते.
बहुतेक लोक जेवण केल्यानंतर थेट कामावर जातात. जेवल्यानंतर साधारण1 0 मिनिटे चालावे, असा सल्ला दिला जातो. असे न केल्याने खाल्लेले अन्न शरीराला फायदा होण्याऐवजी हानी पोहोचवू शकते. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असूनही लोक जेवल्यानंतर थेट कामाला लागतात. त्यामुळे शरीराला अधिक नुकसान होते.
(टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा)
संबंधित बातम्या :
Tea | नको जिम, नको डाएट, आठ प्रकारचे चहा पिऊन पोटावरची चरबी कमी करा
वर्क फ्रॉम होमसाठी अधिक डेटा पाहिजे? पाहा Jio आणि Airtel चे बेस्ट ब्रॉडबँड प्लॅन्स