Tourist Place: डिसेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत 3 बेस्ट ठिकाणं

| Updated on: Dec 06, 2023 | 3:18 PM

Tourist Place for December : डिसेंबर महिन्यात फिरायला जाण्यासाठी अनेक जण तयारी करत असतात. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जेथे तुम्ही फिरायला जावू शकतात. कोणती आहेत ती तीन ठिकाणं जेथे तुम्हाला निसर्गाचं सौंदर्य पाहायला मिळू शकतं.

Tourist Place: डिसेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत 3 बेस्ट ठिकाणं
Tourist place
Follow us on

Tourist place for December : भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या विशेषता आहे. ज्याची खासियत शोधण्यासाठी लोकं दुरुन येत असतात. अनेकांना प्रवासाची खूप आवड असते. त्यामुळे ते वेगवेगळ्या जागांना एक्सप्लोर करतात. अनेक निसर्गप्रेमी हे निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी वेळ काढून अशा ठिकाणी भेट देत असतात. भारतात असे अनेक ठिकाणं आहेत. जी निसर्गाच्या सौंदर्याने नटलेली आहेत. तुम्हीही अशी जागा शोधत असाल तर आम्ही तुम्हाला काही पर्याय देणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही पर्यटनासाठी जावू शकता.

कुमारकोम (केरळ)

केरळमधील बहुतेक ठिकाणे सुंदर असली तरी तुम्ही या ठिकाणी नक्की जाण्याचं नियोजन करा. ही जागा तुम्हाला नक्कीच आवडेल. कुमारकोमपासून तुम्ही नक्की काही तरी घेऊन जाल. जेथे अफाट सौंदर्य आहे. हाऊसबोटीत बसून बॅकवॉटरमध्ये प्रवास करणे हा एक अनोखा अनुभव असतो. मसाज, स्थानिक खाद्यपदार्थ, घनदाट जंगलात फिरणे अशा अनेक गोष्टी इथे एकाच वेळी अनुभवता येतात.

किन्नौर (हिमाचल प्रदेश)

हिमाचलमध्ये भेट देण्याच्या ठिकाणांपैकी शिमला आणि मनाली ही ठिकाणे प्रथम येतात, ही ठिकाणे सुंदर आहेत यात काही शंका नाही, परंतु वर्षातील बहुतेक महिने येथे पर्यटकांची गर्दी असते, त्यामुळे अनेकवेळा तुम्ही आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही हिमाचलमधील सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या किन्नौरला नक्की भेट देऊ शकता. हिवाळ्याच्या मोसमात येथे आल्यावर तुम्ही हिमवर्षाव देखील पाहू शकता. हिंदुस्थान आणि तिबेटच्या उंच पर्वतांचे सुंदर नजारेही येथून दिसतात.

पहलगाम (काश्मीर)

निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी लोक जगभरातून काश्मीरला येत असतात. काश्मीरमध्ये असं एक ठिकाणी आहे जे तुम्हाला नक्कीच आवडले ते ठिकाण म्हणजे पहलगाम. येथे गेल्यावर तुम्हाला परदेशात फिरल्यासारखे वाटेल. बर्फाच्छादित पर्वत आणि वाहत्या नद्या हे एखाद्या चित्राप्रमाणे दिसतात. हिवाळ्यात इथला निसर्ग तुमचं मन नक्कीच जिंकेल.