मुंबई: उन्हाळ्याचा हंगाम येताच आपला चेहरा धूळ, प्रदूषण आणि घामाने भरू लागतो. यामुळे तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण आणि मृत त्वचा जमा होऊ लागते, ज्यामुळे तुमचा चेहरा निस्तेज आणि काळा दिसतो. मग या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही महागड्या पार्लरमध्ये जाऊन फेशियल करून घेता. पण प्रत्येक वेळी एवढा पैसा खर्च करणं सोपं नसतं. आज आम्ही तुमच्यासाठी देसी फेस स्क्रब बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. कॉफी आणि दुधाच्या मदतीने देसी फेस स्क्रब तयार केला जातो. या दोन्ही गोष्टी त्वचेला एक्सफोलिएट करून पोर्स मधील घाण आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात, तर चला जाणून घेऊया देसी फेस स्क्रब कसा बनवावा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)