फक्त हे 3 होममेड फेस मास्क चेहऱ्याला लावा, जादू बघा!

| Updated on: Aug 19, 2023 | 9:43 PM

शरीराप्रमाणेच चेहऱ्याची त्वचाही डिटॉक्स करण्याची गरज असते. यासाठी तुम्ही हे 3 होममेड फेस मास्क वापरा. त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत कारण ते पूर्णपणे नैसर्गिक आहेत. चला जाणून घेऊया...

फक्त हे 3 होममेड फेस मास्क चेहऱ्याला लावा, जादू बघा!
skin care 4 face masks
Follow us on

मुंबई: चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी अनेकदा लोक महागड्या स्किन केअर क्रीम आणि प्रॉडक्ट्सचा वापर करतात. पण त्यानंतरही त्यांना काही विशेष परिणाम मिळत नाहीत. काही काळासाठी तुम्ही सुंदर आणि आकर्षक दिसू शकता. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी अशी मार्केट प्रॉडक्ट्स प्रभावी ठरत नाहीत. बदलत्या ऋतूत बहुतेक लोक त्वचेच्या समस्येने अस्वस्थ होऊ लागतात. चिकट, पाऊस आणि आर्द्रतेमुळे त्वचा निरोगी राहत नाही. मुरुम, ब्लॅकहेड्स आणि चेहऱ्यावर डाग येण्याची समस्या असते. तसेच त्यांच्या त्वचेवरील चमक नाहीशी होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही एक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. शरीराप्रमाणेच चेहऱ्याची त्वचाही डिटॉक्स करण्याची गरज असते. यासाठी तुम्ही हे 4 होममेड फेस मास्क वापरा. त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत कारण ते पूर्णपणे नैसर्गिक आहेत. चला जाणून घेऊया…

1. केळीचा फेस मास्क

हा मास्क कोणत्याही ऋतूत सहज उपलब्ध होतो. त्यामुळे केळीचा वापर हे खाण्याबरोबरच चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठीही तुम्ही करू शकता. केळीचा फेसपॅक बनवण्यासाठी केळी चांगलं मॅश करा. आता त्यात एक चमचा मध आणि दोन चमचे फ्रेश क्रीम घाला. पेस्ट तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावा. २० ते ३० मिनिटे असेच ठेवावे. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्यावा. हा फेसपॅक तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर करतो आणि चेहऱ्याला मॉइश्चरायझ करतो.

2. टोमॅटो फेस पॅक

टोमॅटो खाल्ल्याने आरोग्याला जितका फायदा होतो, तितकाच चेहरा चमकण्यासही मदत होते. आपण टोमॅटो मॅश करा आणि त्याचा रस काढा. आता एका बाऊलमध्ये दोन चमचे टोमॅटोचा रस आणि एक चमचा मध मिक्स करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. यामुळे तुमची त्वचा डिटॉक्स होईल.

3. ग्रेप फेस पॅक

द्राक्षे हे थोडे महागडे फळ आहे हे मान्य आहे, परंतु हे एक उत्तम डिटॉक्सिंग एजंट आहे. फेसपॅक तयार करण्यासाठी थोडी द्राक्षे मॅश करा. आता त्याचा रस काढा आणि एका भांड्यात दोन चमचे पीठ मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. अर्धा तास चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. आठवड्यातून 3 ते 2 वेळा असे केल्याने तुमचा चेहरा डिटॉक्स होईल. तसेच डागही दूर होतील.