मुंबई: आपला चेहरा सुंदर आणि स्वच्छ दिसावा अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, यासाठी अनेकदा फेसवॉशचा वापर केला जातो. बहुतेक ब्युटी प्रॉडक्ट्स बनवणारे फेस वॉश नैसर्गिक असल्याचा दावा करतात, पण अशी क्वचितच उत्पादने आहेत ज्यात रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही. जर हे रसायन आपल्या त्वचेला बराच वेळ स्पर्श करत असेल तर नुकसान होणारच आहे. हळूहळू हे आपल्या त्वचेची चमक कमी करू शकते. हे टाळण्यासाठी आपण घरी तयार केलेल्या फेस वॉशचा वापर करणे महत्वाचे आहे.
मूग डाळ आपल्या सर्व घरांमध्ये खूप वापरली जाते, परंतु चेहऱ्याचे सौंदर्य निर्माण करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यासाठी सर्वप्रथम डाळ मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून पावडर बनवा. आता गरजेनुसार पाणी घाला. मग ते हातात घालून चेहऱ्यावर मसाज करा. थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. असे केल्याने चेहऱ्यावर चमक येईल.
बेसनचा वापर भजी तयार करण्यासाठी केला जातो, परंतु त्याचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील केला जातो. बेसनची पावडर उपलब्ध नसल्यास चणाडाळ मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करावी. त्वचा कोरडी असेल तर तिळाच्या तेलात मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावर ओलावा येईल. त्वचा तेलकट असेल तर तिळाच्या तेलाऐवजी पाणी मिसळा.
ओट्स हे हेल्दी फूड म्हणून ओळखले जातात, मात्र त्याद्वारे त्वचाही सुंदर बनवता येते. सर्वप्रथम, एक कप ओट्स घ्या आणि ते बारीक करा. आता त्यात गुलाबजल घाला. हे चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवून टाका. यामुळे त्वचा चमकदार तर होईलच, शिवाय पिंपल्स, मुरुम आणि इतर समस्याही दूर होतील.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)