मुंबई : लांब सडक केस सर्वच महिलांना आवडतात पण आजच्या व्यस्त जीवनशैली, अस्वास्थ्यकर आहार, ताण यामुळे हे शक्य नाही. बहुतांश लोकांना केसांची काळजी घेण्यास वेळ नसतो, अशा स्थितीत केस गळणे, केस तुटणे, केसांमधील कोंडा इत्यादी समस्या वाढतात. या व्यतिरिक्त दिवसेंदिवस आपले केस कमकुवत होतात. पण जर तुम्हाला निरोगी आणि जाड केस हवे असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर करून तुम्हीही समस्या कमी करू शकता.
केस वाढण्यासाठी काही हेल्दी टिप्स (Hair Care Simple and easy ways to grow hair)
केसांना तेलाने नियमितपणे मालिश करणे केसांसाठी फायदेशीर असते. केसांना केलेल्या मालिशमुळे ब्लड सर्कुलेशन चांगल्या प्रकारे होते. डोक्याला केलेल्या मालिशमुळे तणावापासून मुक्तता देखील मिळते. मालिशमुळे केसांचे गळणे मोठ्या प्रमाणात थांबते. आठवड्यातून एक दोन दिवस केसांना मालिश करणे फायद्याचे ठरते. मालिश केल्याने चांगली झोप देखील येते, त्याचप्रमाणे केसांची वाढ मोठ्या प्रमाणात होते.
केसांच्या नियमित वाढीसाठी त्यांना ट्रिम करणे गरजेचे असते. केसांच्या वाढीसाठी केस महिन्यातून एकदा ट्रिम करणे गरजेचे असते.
केसांमध्ये जमा झालेला मळ काढण्यासाठी योग्य प्रकारे शॅम्पू करणे गरजेचे असते. योग्य प्रकारे शॅम्पू करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये केस स्वच्छ धुवून घ्या. जास्त गरम पाण्यामध्ये केस धुवू नका त्यामुळे केसांना इजा पोहचू शकते.
अनेक वर्षांपासून केसांच्या वाढीसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. तांदळाच्या पाण्यामध्ये असणाऱ्या अमीनो एसिड आणि कार्बोहाइड्रेटमुळे केसांना उत्तम वॉल्यूम मिळतो.
प्रथिने आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. या व्यतिरिक्त, आपल्या केसांच्या वाढीसाठी हे खूप महत्वाचे आहे. आहारात संतुलित आहार घ्या जेणेकरून केसांना पुरेसे प्रथिने मिळतील. कारण पोषक घटक तुमच्या टाळूला बळकट करण्यात मदत करतात. बायोटिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, ई, ओमेगा -3 असलेल्या या गोष्टी खा.
कॅफीन असलेली उत्पादने पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या केसांसाठी फायदेशीर असतात. आपण केसांना दररोज कॅफीनशी संबंधित घटक वापरू शकता. ज्यामुळे आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर जाण्यास मदत मिळते.
(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
इतर बातम्या
Healthy Breakfast | वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश
गुडघ्यातून येणाऱ्या कट- कट आवाजाकडे दुर्लक्ष करताय? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार!
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करा हे 7 उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ