ज्योतिष शास्त्रानुसार सर्व राशीच्या लोकांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती वेळोवेळी बदलत असते. ज्यामुळे अनेक प्रकारचे योग तयार होतात. यातील काही शुभ तर काही अशुभ मानले जातात. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे कुंडलीतही दोष ही निर्माण होतो ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. या अशुभ योगांपैकी एक म्हणजे कालसर्पदोष जो अत्यंत विनाशकार्य मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्याला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. जाणून घेऊ कोणत्या गोष्टीमुळे कालसर्प दोष निर्माण होतो. कालसर्प दोषाची लक्षणे काय आहेत आणि ते दूर करण्याचे काही उपाय.
ज्योतिष शास्त्रानुसार राहू आणि केतू हे दोन्ही मायावी ग्रह मानले जातात. जेव्हा सर्व ग्रह कुंडलीत राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा कालसर्प दोष निर्माण होते. राहू आणि केतू हे छायाग्रह मानले जातात आणि त्यांचे परिणाम अनेकदा नकारात्मक असतात. पीडित लोकांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
ज्योतिष शास्त्रानुसार कालसर्प दोष असलेल्या लोकांनी दररोज महादेवाची पूजा करावी. यासाठी सोमवारी आणि शनिवारी स्नान आणि धान केल्यानंतर गंगाजलात काळे तीळ मिसळून महादेवाला अभिषेक करावा. तसेच सोमवारी आणि शनिवारी काळया तिळाचे दान करावे. त्याचबरोबर कालसर्प दोष दूर करण्यासाठीची पूजा ब्राह्मणाच्या उपस्थितीत करावी. याशिवाय दररोज दोनदा हनुमान चालीसाचे पठण करावे. त्याचबरोबर कालसर्प दोष निवारण यंत्राची पूजा करावी.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)