आठवड्यातून किती वेळा फ्रिज बंद ठेवायला हवा? तुम्हीही करता का ही चूक?

| Updated on: Dec 28, 2024 | 1:04 PM

फ्रिज दिवसभर सुरु ठेवायचा असतो की काही तास बंद ठेवायचा असतो. हे बऱ्याच लोकांना माहित नाहीये. आणि जवळपास 90 टक्के लोकं हीच चूक करतात. पण खरंच आठवड्यातून काहीवेळा फ्रिज बंद ठेवल्याने फायदा होतो का? जाणून घेऊयात

आठवड्यातून किती वेळा फ्रिज बंद ठेवायला हवा? तुम्हीही करता का ही चूक?
Follow us on

आजच्या काळात फ्रिज नसणारं एकही घरं शक्यतो सापडणार नाही. कारण फ्रीजमुळे अन्न किंवा फळ-भाज्या काही दिवसांपर्यंत चांगले ठेवण्यासाठी मदत होते. खाद्यपदार्थही दीर्घकाळ ताजे राहतात.

कितीवेळा फ्रिज बंद ठेवायला हवा?

फ्रीज किंवा रेफ्रिजरेटरचे काम असते अन्नपदार्थ दीर्घकाळासाठी थंड आणि ताजे ठेवणे. रेफ्रिजरेटर अनेक प्रकारचे असतात. त्यांचा मोठमोठ्या कारखान्यापासून ते हॉस्पिटल्स, दुकाने आणि घरगुती वापरासाठी उपयोग होतो. आपण आज फक्त घरगुती वापरासाठी उपयोगात येणाऱ्या फ्रीजबाबतची एक गोष्ट जाणून घेणार आहोत.

लोक रेफ्रिजरेटर वापरतात, परंतु बहुतेक लोक संपूर्ण दिवसभर फ्रीज सुरु ठेवतात. तर, काही लोक दिवसातून अनेक वेळा फ्रिज बंद ठेवतात. कारण त्यामुळे विजेची बचत होते आणि फ्रीज जास्त गरम होत नाही.पण बहुतांश लोकांना हा प्रश्न पडला असेल फ्रीज हा दिवसातून बंद ठेवायचा असतो का?  किंवा असं केल्याने फ्रीजमधील भाजी किंवा अन्न खराब झालं तर, असे अनेक प्रश्न नक्कीच आपल्याला पडूच शकतात.

कारण जवळपास 90 टक्के लोक फ्रीज हा दिवसभर सुरुच ठेवतात. त्यामुळे आठवड्यातून फ्रीज  किती दिवस फ्रीज बंद ठेवायचा? आणि असं केल्यानं फायदा होतो की नुकसान? ते पाहुयात.

फ्रीज बंद केल्याने काय होतं?

काही दिवस किंवा तास फ्रीज बंद ठेवल्यास फ्रीज खराब होणार नाही आणि बराच काळ टिकेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. वास्तविक, फ्रीजमध्ये ऑटो कट ऑफ फीचर आहे, ज्यामुळे फ्रिज आवश्यकतेनुसार आपोआप बंद होतो. अशा परिस्थितीत ते बंद करण्याची गरज नाही.

फ्रीजमध्ये बसवलेले तापमान सेन्सर थंड झाल्यावर आपोआप वीज खंडित करते आणि फ्रीज ओव्हरलोड होत नाही. रेफ्रिजरेटर फक्त साफसफाई किंवा दुरुस्तीच्या वेळी बंद केले पाहिजे. तसेच तुम्ही जर कुठे महिनाभर बाहेर जात असाल तर तुम्ही फ्रीज बंद करू शकता.

2 ते 3 दिवस बाहेर जातानाही फ्रीज सुरु ठेऊ शकता

फ्रीज ऑटो कट असल्याने विजेची बचत होते. जेव्हा रेफ्रिजरेटरला थंड होण्याची आवश्यकता असते, तेव्हा कंप्रेसर आपोआप बॅकअप सुरू होतो. तुम्ही 1-2 दिवस घराबाहेर जात असाल तरीही तुम्ही फ्रीज चालू ठेवू शकता. यातून कोणतेही नुकसान होणार नाही.