उन्हाळ्यात दररोज किती कप कॉफी पिणे योग्य? तज्ञांकडून जाणून घ्या

| Updated on: Apr 09, 2025 | 9:18 PM

लोकांना वेगवेगळ्या प्रकारे कॉफी पिणे आवडते. अनेक लोकांना कॉफी पिण्याची इतकी आवड असते की ते दिवसातून 4 ते 5 वेळा कॉफी पितात. पण उन्हाळ्यात कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात दिवसातून किती कॉफी प्यावी हे तज्ञांकडून जाणून घेऊया.

उन्हाळ्यात दररोज किती कप कॉफी पिणे योग्य? तज्ञांकडून जाणून घ्या
Coffee
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us on

प्रत्येक लोकांची सकाळ एक कप कॉफीने सुरू होते. हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कारण कॉफीमध्ये कॅफिन असते, जे थकवा कमी करण्यास, ऊर्जा प्रदान करण्यास आणि सक्रिय राहण्यास मदत करते. यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते. जर तुम्ही कॉफी योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात सेवन केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.

अनेक लोकांना कॉफी पिण्याची इतकी आवड असते की ते दिवसातून तीन ते चार वेळा कॉफी पितात. कॉफीचे अनेक प्रकार आहेत, त्यात एस्प्रेसो, कॅपुचिनो, लट्टे हे सर्वात सामान्य प्रकार आहेत, जे प्रत्येकाला त्यांच्या आवडीनुसार पिण्यास आवडतात. अनेकांना कॉफीमध्ये दूध घालून पिणे आवडते, तर अनेकांना ब्लॅक कॉफी पिणे आवडते. पण कॉफी हा प्रकार खुप उष्ण मानले जाते, म्हणून उन्हाळ्यात दिवसातून किती कॉफी प्यावी.असा प्रश्न अनेकांना पडतो, चला तर मग याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया

दिवसातून किती कपव कॉफी प्यावी?

दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील इंटरनल मेडिसिन आणि इन्फेक्शन डिसीजेसमधील सल्लागार डॉ. अंकित बन्सल सांगतात की उन्हाळ्यात कॉफी मर्यादित प्रमाणात प्यावी, कारण त्यात कॅफिनचे प्रमाण जास्त असते जे शरीराला डिहायड्रेट करू शकते आणि या हंगामात जास्त कॉफी प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन, अ‍ॅसिडिटी आणि निद्रानाश या समस्या निर्माण होऊ शकतात.

डॉक्टर सांगतात की उन्हाळ्यात दिवसातून 1 ते 2 कप कॉफी पिणे पुरेसे आहे, विशेषतः अशा लोकांसाठी ज्यांना खूप घाम येतो किंवा बाहेर बराच वेळ घालवतात. ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिन जास्त असते, ज्यामुळे जास्त घाम येतो आणि डिहायड्रेशन होऊ शकते, तर दुधासह कॉफी थोडी हलकी असते आणि पोटावर सौम्य परिणाम करते.

जर तुम्हाला कॉफी पिण्याची खूप आवड असेल, तर उन्हाळ्यात कॉफी पिताना पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे, जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील. जर कॉफी पिण्यामुळे चक्कर येणे, अस्वस्थता किंवा पोटात जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवत असतील तर त्याचे प्रमाण ताबडतोब कमी करावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कॉफी कोणी पिऊ नये?

ज्या लोकांना उच्च रक्तदाब, आम्लता, डिहाइड्रेशन, निद्रानाश किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी कॉफी पिणे टाळावे किंवा मर्यादित प्रमाणात प्यावे. गर्भवती महिलांना कमी प्रमाणात कॉफी पिण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यात जास्त प्रमाणात कॅफिन असल्याने बाळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो.

काळी कॉफी की दुधासह कॉफी, कोणते बरोबर आहे?

अनेकांना दुधासोबत कॉफी पिणे आवडते तर काहींना ब्लॅक कॉफी पिणे आवडते. पण या दोघांमध्ये ब्लॅक कॉफी अधिक फायदेशीर मानली जाते. ब्लॅक कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. दुधापासून बनवलेल्या कॉफीमध्ये पोषक तत्वे असतात, तर त्यात कॅलरीजही जास्त असतात. वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरू शकते. पण ते तुमच्या आवडीनुसार आणि शरीराच्या गरजेनुसार सेवन करावे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)