नवी दिल्ली – निरोगी राहण्यासाठी पोषक आहाराचे सेवन करणे आणि नियमित व्यायाम (Diet and Exercise routine)करणे, हे चांगले मानले जाते. परंतु या दिनक्रमाचा चांगला लाभ मिळेलच हे गरजेचे नाही. आहाराचे पालन करताना, त्याच्याशी संबंधित प्रत्येक बाबीची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. हिवाळ्यात ड्रायफ्रूट खाणे (Dry Fruits) सामान्य आहे, परंतु ते किती आणि केव्हा खावे यासाठी योग्य माहिती (Dates eating tips)जाणून घेणे आवश्यक आहे. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, तुम्हाला खजूर खायला आवडत असेल तर त्याची योग्य वेळ व ते किती खावेत याचे प्रमाण पाळणेही महत्वाचे ठरते.
खजूर का खावा ?
खजूर हे एक सुपरफूड आहे, त्यामध्ये पोटॅशिअम, कार्ब्स, प्रथिने, फायबर, नैसर्गिक साखर, लोह आणि कॅल्शिअम यासारखी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात, खजूर हे हेल्दी आणि चविष्टही असतात. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी आपण दररोज त्याचे सेवन केले पाहिजे.
खजूर खाण्याची ही उत्तम वेळ कोणती ?
हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, भूक लागल्यावर दिवसभरात एक खजूर खायला पाहिजे. एखादा पदार्थ तोंडात टाकल्यानंतर त्याची पचनक्रिया सुरू होते, कारण पाचक एन्झाईम्सही तोंडात असतात. तुम्ही न्याहरीमध्येही खजूर अथवा त्यापासून बनलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. किंवा दुपारीही स्नॅक्स म्हणून खजूर खाऊ शकता.
दिवसभरात किती खजूर खावेत ?
तुम्ही दररोज खजूर खाणार असाल तर दिवसभरात 2 किंवा 3 खजूर खावेत. थंडीचे दिवस असले तरी कोणताही पदार्थ एका ठराविक मर्यादेत खाल्ला तर उत्तम ठरते अन्यथा त्रास होऊ शकतो.
या परिस्थितीत खजूर खाऊ नये
– जर तुम्ही पचण्यास जड असे पदार्थ खात असाल तर त्यानंतर खजूर खाऊ नये. कारण खजूर फायबरचे सर्वोत्तम स्त्रोत असतात. जेवणानंतर खजूर खाल्यास तुम्ही अतिसेवनाचे शिकार होऊ शकता.
– तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल तर अशा परिस्थितीत खजूर खाऊ नका. खजूर खाण्यापूर्वी डॉक्टरांचा अथवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)