मुंबई : वाढता तणाव आणि बदलतं लाईफस्टाईल यामुळे लोकांमध्ये ब्लड प्रेशर सारखी समस्या उद्भवते. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवलं नाही तर हृदय विकाराचा तीव्र झटका देखील येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात असणं जास्त जरुरीचं आहे. ज्या लोकांचं ब्लड प्रेशर कमी-जास्त होतं, ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे, अशा लोकांना नियमितपणे ब्लड प्रेशरचं मोजमाप करावं लागतं (How to check blood pressure).
ब्लड प्रेशर कमी-जास्त होणं धोकादायक आहे. ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांना ब्लड प्रेशर चेक करण्याचा योग्य वेळ कोणता ही माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही ब्लड प्रेशर डॉक्टरांकडे जाऊन किंवा घरी देखील चेक करु शकतात. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णाचं जेवणाची वेळ, रोजचा दिनक्रम महत्त्वाचा असतो.
ब्लड प्रेशर मोजण्याआधी नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतं हे तुम्हाला ठाऊक हवं. ब्लड प्रेशर मोजमापणाचे दोन नंबर असतात. त्यापैकी एक सिस्टोलिक आणि दुसरं डायस्टॉलिक ब्लड असतं. ब्लड प्रेशर मिलीमीटरमध्ये मोजतात (How to check blood pressure).
अमेरिक हार्ट असोसिएशननुसार ब्लड प्रेशरचे पाच प्रकार असतात.
1) सामान्य ब्लड प्रेशर
120/80 मिमी एचजी पेक्षा कमी ब्लड प्रेशरला सामान्य ब्लड प्रेशर म्हणतात.
2) एलिवेटिड
ब्लड प्रेशरची रिंडींग जेव्हा 120 ते 129 सिस्टोलिक आणि डायस्टोलिक 80 मिमी एचजी पेक्षा कमी असते तेव्हा त्या स्थितीला एलिवेटिड म्हणतात. अशा प्रकारची स्थिती ज्या लोकांमध्ये वारंवार येते त्यांना हाय ब्लड प्रेशरची शक्यता असते.
3) हाय ब्लड प्रेशरचा पहिला टप्पा
या टप्प्यात ब्लड प्रेशर 130-139 सिस्टोलिक आणि 80-89 मिमी एचजी डायस्टोलिक असतो.
4) हाय ब्लड प्रेशरचा दुसरा टप्पा
या टप्प्यात ब्लड प्रेशर 140/90 मिमी एचजी पेक्षाही जास्त असतं.
5) शेवटचा टप्पा
ब्लड प्रेशरची रिडिंग 180/120 मिमी एचजी पेक्षा अधिक असते तेव्हा ती परिस्थिती त्रासदायक ठरु शकते. अशावेळी तातडीने डॉक्टरांकडे उपचारासाठी जावं.
हेही वाचा : भारतातील 3 कोटी पेक्षा जास्त लहान मुलं डिस्लेक्सियाने पीडित, हा आजार आहे तरी काय?