या घरगुती तेलाने करा 5 मिनिटे मसाज, केस गळतीवर उत्तम उपाय!

| Updated on: Mar 05, 2023 | 4:27 PM

आपले केस हळूहळू पातळ होत आहेत. अशावेळी तुम्हीही टक्कलपणाचे शिकार होऊ शकता. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी हेअर फॉल कंट्रोल ऑइल घेऊन आलो आहोत.

या घरगुती तेलाने करा 5 मिनिटे मसाज, केस गळतीवर उत्तम उपाय!
Hair fall
Follow us on

केस तुमच्या सौंदर्यात भर घालतात. पण आजची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि प्रदूषण यामुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. तसेच आपले केस हळूहळू पातळ होत आहेत. अशावेळी तुम्हीही टक्कलपणाचे शिकार होऊ शकता. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी हेअर फॉल कंट्रोल ऑइल घेऊन आलो आहोत. जास्वंदमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात जे केसांमध्ये सुपरफूडसारखे काम करतात. जास्वदांचं तेल आणि बदाम तेल यांचे मिश्रण आपल्या गळत्या केसांवर जादूसारखे काम करते. जर तुम्ही हेअर केअरमध्ये या हेअर मास्कचा समावेश केला तर केसगळतीवर नियंत्रण ठेवून केस सुंदर, दाट आणि मजबूत बनण्यास मदत होते, तर चला जाणून घेऊया हेअर फॉल कंट्रोल ऑइल कसे बनवावे.

केसगळती नियंत्रित करण्यासाठी लागणारे घटक तेल

  • जास्वदींच्या तेलाचे काही थेंब
  • 2 चमचे बदामाचं तेल

हेअर फॉल कंट्रोल ऑइल कसे बनवावे?

  • हेअर फॉल कंट्रोल ऑइल बनवण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम बदामाचे तेल घ्या.
  • मग ते हलकेच कोमट करून जास्वदींच्या तेलात मिसळू शकता.
  • आता तुमचे हेअर फॉल कंट्रोल ऑइल तयार आहे.

हेअर फॉल कंट्रोल ऑइल कसे वापरावे?

  • हेअर फॉल कंट्रोल ऑइल घ्या आणि ते आपल्या टाळूवर चांगले लावा.
  • त्यानंतर केसांना कमीत कमी 5-10 मिनिटे मसाज करा.
  • यानंतर सुमारे तासभर केसांमध्ये ठेवा.
  • त्यानंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवा.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)