घरच्या घरी गुलकंद कसा बनवायचा? वाचा एकदम सोपी रेसिपी

| Updated on: Jun 14, 2023 | 3:28 PM

उन्हाळ्यात गुलकंदाचे सेवन केल्यास शरीराला शीतलता आणि ऊर्जा मिळते. रेग्युलर जॅमच्या जागी तुम्ही हे करू शकता. याशिवाय गुलकंद एक उत्तम माऊथ फ्रेशनर म्हणूनही काम करते, तर चला जाणून घेऊया घरी गुलकंद कसे बनवायचे.

घरच्या घरी गुलकंद कसा बनवायचा? वाचा एकदम सोपी रेसिपी
How to make gulkand
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: गुलाबाच्या साहाय्याने गुलकंद बनवले जाते, जे चवदार तसेच आरोग्यदायी असते. आज आम्ही तुमच्यासाठी घरी गुलकंद बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. गुलाबाच्या पाकळ्या आणि साखरेच्या साहाय्याने गुलकंद तयार केला जातो. अनेक जण गुलकंदला गुलाबाचा जॅम देखील म्हणतात. उन्हाळ्यात गुलकंदाचे सेवन केल्यास शरीराला शीतलता आणि ऊर्जा मिळते. रेग्युलर जॅमच्या जागी तुम्ही हे करू शकता. याशिवाय गुलकंद एक उत्तम माऊथ फ्रेशनर म्हणूनही काम करते, तर चला जाणून घेऊया घरी गुलकंद कसे बनवायचे.

गुलकंद तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

  • गुलाबाच्या ताज्या पाकळ्या
  • साखर
  • 1 टीस्पून बडीशेप
  • वेलची पावडर

गुलकंद कसे बनवायचे?

  • गुलकंद बनवण्यासाठी आधी ताजे गुलाब घ्या.
  • नंतर त्याच्या पाकळ्या तोडून स्वच्छ पाण्याने धुवून वाळवाव्यात.
  • यानंतर एका भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर टाका.
  • नंतर हाताच्या साहाय्याने साखर आणि गुलाबाच्या पाकळ्या नीट मॅश करा.
  • यानंतर एका कढईत साखर आणि गुलाबाचे मिश्रण घालावे.
  • नंतर गॅसवर साधारण 2-3 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यात 1 चमचा बडीशेप आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
  • नंतर साधारण 2-3 मिनिटे शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यात 1 चमचा मध घालून मिक्स करावे.
  • यानंतर ते चांगले वितळून जॅम सारखं मिश्रण तयार करा.
  • आता तुमचा स्वादिष्ट गुलकंद तयार आहे.
  • मग ते पूर्णपणे थंड झाल्यावर आपण ते काचेच्या जारमध्ये साठवून ठेवा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)