वर्किंग वुमन…आज अनेक महिला या वर्किंग वुमन झाल्या आहेत. त्या ऑफिससोबत घराची जबाबदारीही सांभाळत आहेत. पण या ऑफिसमध्ये असताना त्यांचं मन घरी असलेल्या आपल्या मुलाकडे असतं. तो जेवला का, तो काय करत असेल अशा असंख्य प्रश्नांनी त्यांचं मन ऑफिसमध्ये असून घरात असतं. मग अशावेळी ऑफिसमधील कामावर त्याचा परिणाम होतो. मग अशावेळी आम्ही आहोत ना तुम्हाला मदत करायला. आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यांनी तुम्हाला नक्की फायदा होईल.
घरातील कामाची विभागणी करा
घरात नवरा बायको आणि मुलं असं तुमचं त्रिकोण कुटुंब असेल. आणि जर आजीआजोबाही असतील तर मग तुमचं काम खूप सोपं होऊन जातं. घरातली कामांचं कुटुंबातील सगळ्यांमध्ये विभागणी करा. संसार हा सगळ्यांचा असतो. एकमेकांना साथ देत पुढे जायचं असतं. त्यामुळे काम करताना तुमचं ओझ काही प्रमाणात कमी होईल.
मुलांना घरी फोन करण्याची वेळ ठरवा
ऑफिसमध्ये असताना ऑफिसच्या कामाला महत्त्व द्या. नोकरी करणे हा तुमचा निर्णय असतो. त्यामुळे नोकरी करताना सारखा घरचा विचार करुन कामावर परिणाम करुन घेणे योग्य नाही. हा तुमच्या कामासोबत तुम्ही केलेला अन्याय असतो. म्हणून घरी मुलांना फोन करण्याच्या वेळा ठरवून घ्या. सतत घरी फोन करु नका. तर मुलांमध्ये असा विश्वास निर्माण करा की ते तुमच्या काम समजून घेऊन तुम्हाला सारखे फोन करणार नाही.
मल्टी टास्किंग हवा
महिलांना घर आणि नोकरी सांभाळायची असेल तर महिलांना मल्टी टास्किंग होणं गरजेचं आहे. एका वेळी कामाचं नियोजन करुन ती एकत्र करता आली पाहिजे. कुकर लावला असेल तर त्या वेळेमध्ये दुसरीकडे मशिनला कपडे लावणे, झाडांना पाणी टाकणे आदी काम करता आले पाहिजे. अगदी घरातली छोटी मोठी काम करताना आपल्या मुलाशी गप्पा मारा त्याचा खेळा.
घर आणि नोकरी एकत्र करत कामय हसरा चेहरा ठेवणे ही गोष्ट काही सोपी नसते. ऑफिसचं टेन्शन असून घरात सगळ्यांकडे लक्ष देणे त्यांच्या आवडीनिवडी सांभाळणे यासाठी महिलांना खरंच सलाम आहे.